बाजारातून विकत आणलेली प्रत्येक गोष्ट फ्रिजमध्ये ठेवली जाते. फळे भाज्यांपासून ते अगदी लहान मुलांच्या खाण्याचे पदार्थ सुद्धा फ्रिजमध्येच ठेवले जातात. पालेभाज्या किंवा फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते ताजे आणि दीर्घकाळ टिकून राहते, असे सगळ्यांचं कायम वाटते. पण फ्रिजमध्ये ठेवलेले हे पदार्थ शरीरासाठी विष बनतात आणि संपूर्ण आरोग्याचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारे हे पदार्थ अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नये. काहीवेळा पदार्थ ताजे आणि जास्त दिवस टिकून राहावेत, म्हणून फ्रिजमध्ये ठेवले जातात पण याउलट पदार्थ खराब होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 'हे' पदार्थ, आतड्यांचे आरोग्य बिघडण्यासोबतच शरीराला पोहचेल गंभीर हानी

फ्रिजमध्ये ठेवलेले बटाटे थंड झाल्यानंतर त्यात स्टार्चचे प्रमाण वाढू लागते. स्टार्च वाढल्यामुळे बटाट्याची चव लागते आणि रंग बदलून जातो. जास्त गोड बटाटा खाल्ल्यामुळे शरीरात स्टार्चचे प्रमाण वाढते आणि मधुमेह वाढण्याची शक्यता असते.

कापून ठेवलेले कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो मऊ होतो. याशिवाय कांद्याला बुरशी आल्यानंतर कुबट वास येण्यास सुरुवात होते. जेवण बनवताना फ्रिजमध्ये ठेवलेल्या कांद्याचा अजिबात वापर करू नये.

फ्रिजमध्ये लसूण सोलून ठेवल्यास तिला कोंब येण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय लसूणमधील आवश्यक घटक नष्ट होऊन लसूण चवीला चांगली लागत नाही.

थंड तापमानामध्ये टोमॅटो ठेवल्यानंतर त्याची गुणवत्ता खराब होणयाची शक्यता असते. तसेच टोमॅटोची चव पूर्णपणे बदलते.

आपल्यातील अनेकांना फ्रिजमधील थंड कॉफी पिण्याची खूप जास्त सवय असते. पण असे न करता कॉफी बनवल्यानंतर ती लगेच प्यावी.






