चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, डाग, पिगमेंटशन, सुरकुत्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर ट्रीटमेंट केल्या जातात. पण यामुळे काही काळापुरता त्वचेवर ग्लो टिकून राहतो चेहरा सुंदर दिसतो. कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतील. (फोटो सौजन्य – istock)
चमकदार त्वचेसाठी आजपासूनच प्या 'हे' नॅचरल ज्यूस, सुरकुत्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

सकाळी उठल्यानंतर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्वचेवरील ग्लो कायम टिकून राहतो.

सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची खूप जास्त सवय असते. पण त्याऐवजी ग्रीन टी प्यावा. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि त्वचेवरील पिंपल्स कमी होतात.

बीट गाजरचा रस प्यायल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यासोबतच त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळेल. बीटचा रस प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

आवळा त्वचेसाठी सुपरफूड मानला जातो. यामध्ये खूप जास्त विटामिन सी असते. कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी आवळ्याचा रस प्यायला जातो. यामुळे त्वचा सैल पडत नाही.

रात्री झोपण्याआधी नियमित एक ग्लासभर दुधात हळद मिक्स करून प्यावी. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि त्वचा चमकदार, ग्लोइंग राहील.






