सगळ्यांच आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यातसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचा निस्तेज होणे, कोरडी पडणे किंवा पिंपल्स येणे इत्यादी त्वचेसंबधित समस्या जाणवू लागतात. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी क्रीम लावण्याऐवजी आहारात पौष्टिक आणि त्वचेला पोषण देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया चेहऱ्यावरील ग्लाे वाढवण्यासाठी कोणत्या फळे आणि भाज्यांचे ज्यूस नियमित रस प्यावा. (फोटो सौजन्य – istock)
कडक उन्हाळ्यात वाटेल गारेगार आणि फ्रेश! चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी नियमित करा या पेयांचे सेवन, त्वचा होईल सुंदर

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा गाजर आणि बीटाचा ज्यूस प्यावा. हा ज्यूस त्वचा आणि केसांसाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो. गाजरमध्ये विटामीन ए आणि बीटमध्ये आयर्न, लोह भरपूर प्रमाणात आढळून येते.

वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी आणि पुदिन्याचा ज्यूस नियमित प्यावा. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी काकडी प्रभावी ठरते.

विटामिन सी युक्त संत्र्याचा रस प्यायल्यामुळे त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होते. सुरकुत्या आणि कोरड्या त्वचेपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी संत्र्याचा रस प्यावा.

टोमॅटोमध्ये अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी टोमॅटो रस आठवड्यातून दोनदा प्यावा.

केस आणि त्वचेसाठी आवळा खूप जास्त फायदेशीर मानला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळुन येते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आवळ्याचा रस प्यावा.






