सध्या भारताचा पुरुष संघ सध्या चॅम्पियन ट्रॉफी खेळत आहे तर भारतीय महिला खेळाडू सध्या बीसीसीआय आयोजित महिला प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहेत. लवकरच ८ मार्च रोजी महिला दिन जगभरामध्ये साजरा केला जाणार आहे. या दिनी महिलांना सन्मानित केले जाते यामध्ये भारताच्या अशा अनेक महिला खेळाडू आहेत ज्यांनी भारतीय क्रिकेटला वरच्या स्तरावर आणले आहे. यामध्ये जुलन गोस्वामी, मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना यांसारख्या गाजलेल्या महिला खेळाडूंच्या नावांचा समावेश आहेत.
फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
भारताची दिग्गज वेगवान महिला गोलंदाज झुलन गोस्वामी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. झुलनने २८४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५५ विकेट्स घेतल्या. झुलन गोस्वामीने एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक ४३ विकेट्स घेतल्या.
स्मृती मानधनाने सध्या क्रिकेट विश्वामध्ये तिने तिचा दबदबा निर्माण केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तिने आतापर्यत ७ सामने खेळले आहेत, यामध्ये तिने ६२९ धावा केल्या आहेत. तिच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर तिने ९७ सामन्यांमध्ये ४२०९ धावा केल्या आहेत. स्मृतीने आतापर्यत १४० T२० सामने खेळले आहेत, यामध्ये तिने ३७६१ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने महिला क्रिकेट संघाला एका नव्या उंचीवर नेले आहे. मितालीने तिच्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत फक्त १२ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने ४३.६८ च्या सरासरीने ६९९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक द्विशतकाचा (२१४ धावा) समावेश आहे. टी-२० बद्दल बोललो तर तिने ८९ सामन्यांमध्ये २३६४ धावा केल्या आहेत, तर मितालीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १७ अर्धशतकेही केली आहेत. तिने २३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७८०५ धावा केल्या आहेत, या दरम्यान मितालीची सरासरी ५०.६८ आहे.
आता भारताची महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. तीन आतापर्यत ६ कसोटी सामने खेळले आहेत, यामध्ये तिने २०० धावा केल्या आहेत. तर T२० क्रिकेटमध्ये तिने १७८ सामन्यांमध्ये तिने ३५८९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर १४१ सामने खेळले आहेत, यामध्ये तिने ३५८९ धावा केल्या आहेत.
भारताची युवा महिला खेळाडू जेमिमा रॉड्रिक्सने तिच्या कामगिरीने देशभरामध्ये नाव कमावले आहे. तिने आतापर्यत १०७ T२० सामने खेळले आहेत यामध्ये तिने २२६७ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४२ सामन्यांमध्ये १०९३ धावा केल्या आहेत.