इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट्स आणत आहे. वापरकर्त्यांसाठी या अॅपमध्ये स्टेटस लाईक फीचरपासून ते लो लाईट मोड फीचरपर्यंत विविध फीचर्स जोडण्यात आले आहेत. या फीचर्समुळे युजर्सचा अॅप वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होत आहे. कंपनी वापरकर्त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा देण्याचा सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे या अॅपमध्ये विविध आणि मजेदार फीचर्स जोडले जात आहेत. व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी काहीतरी नवीन आणत असतं, ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या चॅट्स मॅनेज करणे सोपे होतं. व्हॉट्सअॅपमधील असंच एक फीचर म्हणजे कस्टम चॅट लिस्ट फीचर, जे वापरकर्त्यांना चॅट फिल्टर करण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
काय आहे WhatsApp चं Custom Chat Lists फीचर, ज्यात फेव्हरेट चॅट अॅड करता येईल; जाणून घ्या
तुमचे व्हॉट्सअॅपवर अनेक मित्र असतील आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तिसोबत बोलायचे असेल तेव्हा तुम्हाला त्यांचे नाव सर्च करावे लागेल. पण आता तुम्हाला हे करण्याची गरज नाही. आता तुम्ही व्हॉट्सअॅपमध्ये एक कस्टम लिस्ट तयार करू शकाल आणि तुमच्या इच्छेनुसार या लिस्टला नाव देखील देऊ शकाल.
व्हॉट्सअॅप कस्टम चॅट लिस्ट फीचरच्या आगमनाने, तुम्हाला असा फायदा होईल की तुम्ही ज्यांच्याशी जास्त बोलता त्या ग्रुप्स आणि वैयक्तिक चॅट्समध्ये तुम्ही लगेच प्रवेश करू शकाल.
व्हॉट्सअॅप कस्टम चॅट लिस्ट फीचर जगभरात लाँच केले जात आहे. ज्यामुळे जगभरातील युजर्सना या फीचरचा फायदा होऊन ते त्यांच्या आवडत्या व्यक्तिसोबत बालू शकतात.
हे वैशिष्ट्य तुमचे विशिष्ट चॅट शोधण्याचे काम अधिक सोपं करेल आणि तुम्हाला कुटुंब, मित्र आणि ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र यादी तयार करण्यास अनुमती देईल. म्हणजेच, या नवीन वैशिष्ट्याच्या मदतीने, चॅट फिल्टर करणे सोपे होईल.
व्हॉट्सअॅप कस्टम चॅट लिस्टचे अनेक फायदे आहेत. कस्टम चॅट लिस्ट ही एक अशी सुविधा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमची चॅट लिस्ट कस्टमाइझ करू शकता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कस्टम लिस्ट तयार करू शकता.
विशिष्ट चॅट शोधण्यासाठी तुम्हाला सर्व चॅट मॅन्युअली स्क्रोल करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ व्हॉट्सअॅप कस्टम चॅट लिस्ट ओपन करावी लागेल जिथे तुम्ही हे चॅट अॅड केलं असेल.