सर्वच मुलींना काळ्या रंगाचे कपडे परिधान करायला खूप जास्त आवडतात. बहुतेक मुलींच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा अनेक काळ्या रंगाचे कपडे असतात. ऑफिस पार्टी, लग्नसमारंभ किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. या रंगावर लूक क्लासी आणि ग्लॅमरस दिसतो. पण बऱ्याचदा काळ्या रंगाची साडी किंवा इतर कोणतेही कपडे परिधान केल्यानंतर त्यावर कोणत्या शेड्सची लिपस्टिक लावावी? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. लिपस्टिकचा शेड चुकल्यानंतर संपूर्ण लूक विचित्र दिसतो. त्यामुळे काळजीपूर्वक आणि कपड्यांना मॅच होईल अशी लिपस्टिक निवडावी. चला तर जाणून घेऊया काळ्या रंगांच्या ड्रेसवर कोणत्या लिपस्टिक दिसतील परफेक्ट.(फोटो सौजन्य – pinterest)
ऑफिस पार्टी असो वा लग्न! काळ्या रंगाच्या ड्रेसवर लावा 'या' ट्रेंडी शेड्सच्या लिपस्टिक, दिसेल परफेक्ट लुक

काळा आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन नेहमीच उठावदार दिसते. यामुळे आकर्षक, दर्जेदार आणि आत्मविश्वासपूर्ण लूक मिळतो. त्यामुळे चेरी रेड, ब्राईट रेड, रुबी रेड आणि क्रिमसन रेड यांसारख्या विविध लाल रंगाच्या शेड्स तुम्ही काळ्या ड्रेस किंवा साडीवर लावू शकता.

हल्ली सर्वच मुलांना नूड शेड्स असलेल्या लिपस्टिक लावायला खूप जास्त आवडतात. काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यानंतर आकर्षक लूकसाठी नूड शेड्स असलेली लिपस्टिक लावावी.

लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही पार्टीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घातल्यास वाईन रंगाची लिप शेड लावावी. यामुळे तुमचा लूक परिपूर्ण दिसेल.

गुलाबी शेड्सच्या विविध लिपस्टिक बाजारात सहज उपलब्ध होतात. रोजच्या वापरात तुम्ही गुलाबी किंवा बेबी पिंक रंगाची लिपस्टिक लावून तुमचा लूक आकर्षक करू शकता.

ज्या मुलींना साधा पण उठावदार लूक हवा असतो, अशांनी ब्राऊन रंगाच्या लिपस्टिकची निवड करावी. काळ्या रंगाच्या कपड्यांवर चॉकलेट ब्राऊन किंवा कॉफी ब्राऊन रंगाच्या शेड्स तुम्ही लावू शकता.






