Bloody Red Island: जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जेथील दृश्ये अनेकांना आकर्षित करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका ठिकाणाविषयी सांगत आहोत जिथली माती रक्तासारखी लाल आहे. करोडो वर्षांपूर्वी झालेल्या एका घटनेमुळे या मातीला असे स्वरूप मिळाले. काय आहे या जागेचा इतिहास चला जाणून घेऊया.
रक्ताने माखलीये या देशाची जमीन, करोडो वर्षांपूर्वी घडलं होत काही असं... फोटो पाहूनच उडेल थरकाप
आमच्या ठिकाणाविषयी बोलत आहोत ते ठिकाण म्हणजे इराणचे होर्मुझ बेट. हे बेट दिसायला फार सुंदर आहे. बेटावरचे पाणी गरम असते आणि इथली बहुतांश लोक मच्छीमारी करतात
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या हॉर्मुझ बेटाची आणखीन एक खासियत म्हणजे इथली माती, जी खाल्ली जाऊ शकते. इथले लोक त्यांच्या जेवणात मीठ आणि मसाल्यांऐवजी या जागेच्या मातीचा वापर करतात
खरं तर, होर्मुझ बेटाच्या वाळूमध्ये लोह आणि मीठासह 70 प्रकारची खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही खनिजे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जातात
येथील लोक अन्नामध्ये वाळू घालण्यापूर्वी ती पूर्णपणे स्वच्छ करतात. इथे स्थानिक लोक मातीचा वापर करून एक खास प्रकारची भाकरी देखील बनवतात.हे जगातील एकमेव बेट आहे जिथे खाण्यायोग्य पर्वत आहेत. इथले गाईड त्यांना चाखायचा सल्ला देत असतात
हे बेट हे निसर्गाच्या सुंदर पेंटिंगपेक्षा काही कमी वाटतं नाही. इथे प्रचंड उष्णता असली तरीही इथल्या पर्यटकांमध्ये कधीही घट होत नाही. लोक दूरदूरवरून या जागेचे सौंदर्य पाहण्यासाठी येथे येतात
ब्रिटनच्या जिओलॉजिकल रिसर्चच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. कॅथरीन गुडनफ यांच्या मते लाखो वर्षांपूर्वी पर्शियन गल्फजवळील समुद्रात मिठाचा जाड थर तयार झाला होता. पुढे त्याच्या वर आणखीन नवीन थर जमा होऊ लागले