प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी हे एक आकर्षक ठिकाण आहे, ज्याचे सौंदर्य आणि इतिहास पर्यटकांना मोहात टाकतात. कॅरिबियन आयलंड्समध्ये स्थित, हा एकमेव असा देश आहे ज्याचे नाव एका महिलेच्या नावावरून ठेवण्यात आले. याची कहाणी फार रंजक असून नक्की ती महिला कोण होती ते आपण आज जाणून घेणार आहोत.
महिलेच्या नावावरून ठेवण्यात आलंय या देशाचं नाव... तुम्हाला ओळखता येईल का?

सेंट ल्युसिया या देशाचे नाव एक महान संत, सेंट ल्युसी यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. त्या संतांनी आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले आणि त्यांचे बलिदान त्यांच्या उच्चतम थोरत्वाचं प्रतीक बनले.

सेंट ल्युसींचं जीवन गरजूंना मदत करण्याच्या संकल्पनेवर आधारित होतं. त्यांनी आपल्या संपत्तीचा त्याग केला आणि गरीब व अंध व्यक्तींना मदतीसाठी स्वतःला समर्पित केलं, ज्यामुळे त्यांना "लाईट" किंवा "लुसिड" म्हणून ओळखलं जातं.

सेंट ल्युसी डे प्रत्येक 13 डिसेंबरला युरोपात साजरा केला जातो. हा दिवस सेंट ल्युसी यांच्या पवित्र जीवनाचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची महती सांगण्यासाठी आयोजित केला जातो.

सेंट ल्युसिया कॅरिबियनमधील एक अत्यंत सुंदर आयलंड आहे, जिथे ज्वालामुखींच्या उद्रेकानंतर तयार झालेले समुद्रकिनारे आणि घनदाट वर्षावन असतात. इथली अद्भुत निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.

सेंट ल्युसियाच्या किनारपट्ट्यांवर असलेल्या आलिशान हॉटेल्समध्ये राहून प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. येथील समुद्रकिनारे आणि शांत वातावरण हॉटेल्सच्या प्रिमियम सेवा आणि पर्यटन स्थळांसह एक अप्रतिम अनुभव देतात.






