सावंतवाडीमध्ये महायुती मध्ये राडा (फोटो- टीम नवराष्ट्र)
सावंतवाडीत शिवसेना आणि भाजपा असे दोन गट एकमेकांना भिडले
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
अंगावर धावून जाणे व शिवीगाळप्रकरणी गुन्हा
सावंतवाडी: मतदानाच्या पार्श्वभूमीवर गाडी अंगावर घालण्याच्या कारणावरून सावंतवाडी येथील वनविभागाच्या समोरील परिसरात शिवसेना आणि भाजपाच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी १०० हून अधिक जणांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा सर्व प्रकार तब्बल दीड ते दोन तास सुरू होता, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून व पोलिसांनी स्वतःहून असे मिळून तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमरीश यादव (विशाल परबांचे चालक) यांच्या तक्रारीवरून धक्काबुक्की, मारहाण आणि गाडी अडवल्याप्रकरणी. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक पदाचे उमेदवार संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, अॅड. नीता सावंत कविटकर नगरसेवक पदाचे उमेदवार अजय गोंदावळे तसेच क्लेटस फर्नाडिस ज्ञानेश्वर पाटकर प्रफुल्ल गोंदावळे आदी वगैरे २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यावेळी भाजपाचे विशाल परब यांचा चालक अमरीश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली व त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतरदोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलिस ठाण्यात बाचाबाची झाले, एकमेकांना खुन्नस देण्याचा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, याप्रकरणी सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण तर उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी उपलब्ध तक्रारी व माहितीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंगावर धावून जाणे व शिवीगाळप्रकरणी गुन्हा
याबाबतची तक्रार ज्ञानेश्वर पाटकर यांनी दिली असून या तक्रारीमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे उमेदवार अॅड. अनिल निरवडेकर नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार २ डिसेंबरला झालेल्या नपच्या मतदानावेळेस सावंतवाडीतील वनविभाग ऑफिस कार्यालयाच्या परिसरात शिवसेना व भाजपाचे दोन गट भिडले होते.
Nilesh Rane : नितेश विरुद्ध निलेश! मालवण कॅश प्रकरणावरुन राणे बंधूंमध्ये पेटलं वाकयुद्ध
पोलिसांकडून दाखल झालेला गुन्ह्यांमध्ये मनाई आदेशाचा भंग करून पोलिस ठाण्यात बेकायदा जमाव करणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे व शिवीगाळ करणे. गुन्हा दाखल असलेले प्रमुख संशयित शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटकर, क्लेटस फर्नाडिस व भाजपाचे कार्यकर्ते अमित परब यांच्यासह ४० ते ५० अज्ञातांवर गुन्हा दाखल कसायात आला आहे.






