तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पक्षाची एंट्री; भाजपसह डीएमके, अण्णा द्रमुक पक्षाला बसणार धक्का?
चेन्नई : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी ‘वी द लीडर्स’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन पक्ष आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे.
सुमारे सहा वर्षे भाजपसोबत जोडलेले राहिलेल्या अण्णामलाई यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, तमिळनाडूमध्ये एका नव्या प्रकारच्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने भाजप सोडली आहे. यादरम्यान त्यांनी एक मोठा खुलासा करताना सांगितले की, ते गेल्या वर्षीच भाजप सोडणार होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
भाजप प्रदेश उपाध्यक्षांसह १५ जणांचे राजीनामे
तामिळनाडू भाजपचे राज्य उपाध्यक्ष कारू नागराजन, राज्य सचिव सुमथी व्यंकटेश आणि किमान १४ अन्य पक्षाच्या अधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. अण्णामलाई यांनी औपचारिकपणे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्यानंतर आणि तामिळनाडूसाठी त्यांची दृष्टी पक्षाच्या नेतृत्वाशी जुळलेली नाही, असे घोषित करून नवीन राजकीय चळवळ सुरू केल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांनी हे राजीनामे आले.
सोशल मीडियावर ‘बायो’ बदलला
अण्णामलाई यांनी त्यांच्या एक्स प्रोफाइलवरून पाहायला मिळाली. त्यांनी बायोमध्ये ‘चांगल्या राजकारणाच्या शोधात असलेला एक सामान्य माणूस !’ असे लिहिले आहे.
तामिळनाडूत अनेक घडामोडी
दुसरीकडे, तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राजीनामा दिला होता. आता हा राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंजूर केला आहे. अण्णामलाई यांना तामिळनाडूच्या राजकारणात स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे.






