छगन भुजबळ बीड ओबीसी महाएल्गार मोर्चाला बबन तायवाडे आणि विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहणार नाहीत (फोटो - सोशल मीडिया)
OBC Mahaelgar Morcha: बीड : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाज आणि नेते नाराज झाले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यांच्या मागण्या मान्य करत सरकारने 2 सप्टेंबर रोजी या संदर्भात एक जीआर काढला. मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भातील शासन परिपत्रक काढण्यात आले. त्याविरोधात आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. याचे नेतृत्व मंत्री, अजित पवार गटाचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ करणार आहेत. मात्र छगन भुजबळ यांना इतर ओबीसी नेत्यांचा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ यांनी बीडमध्ये महाएल्गार मोर्चा आयोजित केला आहे. यामध्ये ते स्वतः मंत्रिमंडळामध्ये असून शासन आदेश विरोधात भूमिका घेतली जाणार आहे.. संपूर्ण राज्यात ओबीसीच्या या मोर्चाची चर्चा असली तरी इतर ओबीसी नेते भुजबळ यांच्यासोबत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कॉंग्रेस आणि ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले विजय वडेट्टीवार हे भुजबळ यांच्या मोर्चेमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजासाठी मोर्चा काढला होता. मात्र यामध्ये छगन भुजबळ सहभागी झाले नव्हते. त्यामुळे आता वडेट्टीवार हे बीडमधील भुजबळ यांच्या सभा आणि मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत. जय वडेट्टीवार यांचा आज त्यांच्या मतदारसंघात दौरा आहेत. भुजबळ आणि वडेट्टीवार हे दोन्ही ओबीसी नेते ओबीसी समाजासाठी भूमिका घेत आहेत. मात्र ओबीसी नेत्यांमध्ये एकजूट दिसून येत नसल्याच्या चर्चा आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे देखील छगन भुजबळ यांनी आयोजित केलेल्या महाएल्गार मोर्च्यामध्ये सहभाग होणार नाहीत. याबाबत त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. बबनराव तायवाडे म्हणाले की, बीडच्या मोर्चातून ओबीसी समाज दिशाभुल होणार नाही, याची काळजी नेत्यांनी घ्यावी, असा टोला तायवाडे यांनी लगावला. २ तारखेच्या ‘जीआर’मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, त्यामुळे आजच्या मोर्चाच्या मागणीला मी सहमत नाही, मला निमंत्रण पण नाही. आमच्या ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहे, मनभेद नाही. भविष्यत ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
.आजच्या बीड येथील मोर्चात ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घ्यावी. नोंद नसलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून शकत नाही. याचिका कुठल्या आधारावर आहे, त्यावरुन सर्वोच्च न्यायालय निर्णय देतील. २ तारखेच्या जीआरमध्ये जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत सांगितली आहे. डायरेक्ट मराठा समाजाला आरक्षण द्या, असं म्हटलं नाही. २ सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांना काय मिळालं? याचं मुल्यांकन त्यांनी करावं. आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, असे देखील मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मांडले. त्यामुळे मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला आहे की नाही याबाबत देखील ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये दुमत असल्याचे समोर येत आहे.