बिहारमध्ये आज नवीन सरकार (फोटो - iStock)
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल आज जाहीर केले जाणार आहे. मतमोजणीला सकाळी आठपासून सुरुवात होणार असून, हळूहळू या निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे. दुपारपर्यंत बिहारमध्ये कोण विजयी ? हे स्पष्ट होईल. हे निकाल बिहार निवडणुकीसाठी असले तरी संपूर्ण देशाची त्याकडे नजर आहे. कारण बिहार निवडणुकीचा निकाल बंगालपासून उत्तर प्रदेशपर्यंतच्या निवडणुकांची दिशा ठरवणारा मानला जातो.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. या निकालाला राजकीय घडामोडींमध्ये एक वळणबिंदू म्हटले जात आहे. म्हणूनच इतर पक्षांबरोबरच भाजपाचेही या निवडणूक निकालांकडे डोळे लागले आहेत. ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे कारण ती बिहारमध्ये एनडीएमध्ये मोठा भाऊ कोण असेल? हे ठरवेल, भाजप ही जागा जिंकेल का की जेडीयू पुन्हा एकदा ताकद मिळवून पूर्वीचे स्थान परत मिळवेल? काही सर्वेक्षणांनी भाकित केले आहे की, भाजप तिसरा सर्वांत मोठा पक्ष बनेल आणि आरजेडी पहिला सर्वात मोठा पक्ष बनेल, ज्यामुळे देशात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या निवडणुकीमुळे चिराग पासवान यांच्या पक्षाची कामगिरी सिद्ध होईल, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत पाचही जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा १००% स्ट्राइक रेट होता असा त्यांचा सातत्याने दावा आहे. यामुळे ते अप्रत्यक्षपणे स्वतःला बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहात आहेत. भाजपमधील एक गट असा दावा करतो की, चिराग पासवान यांचा लोकसभेचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा परिणाम होता.
पोस्टल मतपत्रिकांची सर्वात आधी मोजणी
पोस्टल मतपत्रिकांची सर्वात आधी मोजणी केली जाईल. बिहार विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतपत्रिकांची प्रथम मोजणी केली जाईल. सकाळी 8:30 वाजता ईव्हीएम मतमोजणी सुरू होईल. राज्यातील 38 जिल्ह्यांमध्ये 46 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे 4372 टेबलांवर मतमोजणी होईल.
हेदेखील वाचा : Bihar Election Result 2025: बिहारमध्ये मतमोजणी किती वाजता होणार सुरु? कुठे पाहता येईल LIVE निकाल? संपूर्ण माहिती घ्या जाणून






