सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचा आका विनायक राऊत की वैभव नाईक?; मंत्री नितेश राणे यांचं विधान (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे अंतिम प्रस्ताव मांडण्यात आले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये नेत्यांमध्ये खडाजंगी दिसून आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इलेक्ट्रिक गाड्या आणि त्यावरील कर याबाबत माहिती दिली. यानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले.
काय म्हणाले नितेश राणे?
विधीमंडळाच्या आवारामध्ये मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हे नितेश राणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहे. वादग्रस्त आणि भडकाऊ विधान करत असल्यामुळे तक्रार करणार असल्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. याबाबत नितेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाची बाजू घेणं म्हणजे समाजाची माथी फिरवणं हे कोणत्या चौकटीमध्ये आहे ते माहिती नाही. मुळामध्ये आपल्या देशामध्ये 80 टक्के लोक हे हिंदू आहेत. हिंदू समाजाला सातत्याने सणसूद सुद्धा साजरे करु दिले जात नाही. त्यांच्या सणावेळी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले जातात. हिरवे झेंडे फडकवले जातात. लव्ह जिहादच्या नावाखाली आमच्या भगिनींच्या विरोधात षडयंत्र केले जात असेल तर या सगळ्याचे समर्थन हे संबंधित तक्रारदार करत आहेत का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यापूर्वी त्यांनी एकदा खुल्या मैदानात माझ्याबरोबर चर्चा करावी. मी नेमकी मांडणारी जी भूमिका आहे त्यामध्ये त्यांना कोणता आक्षेप असेल तर. आपल्या देशामध्ये राहून आपल्या देशाच्या विरोधात जर कोणी भूमिका घेत असेल. पाकिस्तान झिंदाबाद म्हणत असेल तर…हिरवा झेंडा फडकवत असेल तर खान यांचे समर्थन आहे का? त्याच्याबद्दल देखील एक पान लिहिलं पाहिजे. आमची भूमिका समजून घ्यायची नाहीये. भूमिका समजून न घेता नितेश राणे वाईट दिसतो. पण हिंदू समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यांच्यावर लव्ह जिहाद करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे हिंदू समाजाच्या बाजूने आम्ही उभे राहत असू तर त्यात आम्ही चुकलो कुठे? आम्ही पाकिस्तानमध्ये उभे नाही. भारतात आहोत. येथे हिंदू समाज सुद्धा राहतो. ते जर माझ्यासोबत चर्चेला आले तर मी त्यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहे,” असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे नितेश राणे यांनी त्यांच्यासाठी भारताचे मुस्लीम कसे आहेत हे सांगितले आहे. ते म्हणाले की, “देशामध्ये राहून भारतासाठी अभिमान बाळगणारे, तिरंग्याप्रती अभिमान बाळगणारे, वंदे मातरम बोलतात. आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात. पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात. कोणीही जिहाद्यांनी आमच्या हनुमान जयंती आणि गणेश चतुर्थीवेळी दगडफेक करतात त्यांचे जे विरोध करतात,ते आमचे मुसलमान आहेत ना. त्यांच्यासाठी काही योजना आणल्या जात असतील तर त्या चुकीचं काय आहे? आमच्या राष्ट्रप्रेमी मुस्लीम बांधवांच्या विरोधात आम्ही कालही नव्हतो आजही नाहीये,” अशी भूमिका मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे.