सुरेश धस यांनी शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावरुन बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला (फोटो - सोशल मीडिया)
बीड : बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवराज दिवटेला मारहाण करण्यात आली. समाधान मुंडे आणि त्याच्या 10 ते 15 ते साथीदारांनी शिवराजला मारहाण केली. या टोळक्याने त्याला डोंगराळ भागामध्ये घेऊन जात लाकडी बांबूनी मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून यामुळे पुन्हा एकदा बीडच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता शिवराज दिवटेला मारहाण प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवराज दिवटेला मारहाण प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. बीडचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर होते. याबाबत माहिती देताना आमदार धस म्हणाले की, ‘बोगस खत लिंकिंग असे प्रश्न मांडले. रॅक पॉईंट अष्टीला मागितला आहे. कृषी सहाय्यकांनी यावेळी संप करायला नव्हता पाहिजे. माती परीक्षण मार्गदर्शन होणे आवश्यक होते बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुंबईत बैठक होईल. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, दादांनी भेटावे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. शिवराज दिवटे याचा यात काही संबंध नाही. गुन्हेगारांनी कोणतीही माहिती न घेता शिवराज दिवटे याच्यावर केलेला तो हल्ला आहे,” असे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आमदार सुरेश धस म्हणाले की, “या प्रकरणात सात आरोपींना आत्तापर्यंत अटक केली आहे म्हणून आम्ही समाधानी आहोत. पोलिसांना विनंती उर्वरित आरोपींना अटक करावे. कारण शिवराज दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे. बीडमधील ही घटना साधीसुधी नाही. मात्र यात कठोरात कठोर कारवाई करावी. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. मोठी गॅंग आत मध्ये गेली आहे. सरकारी पक्षाच्या वकिलांनी आरोपींनी दाखल केलेल्या डिस्चार्ज एप्लीकेशन वर आक्षेप घेतला आहे,” असे मत सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे धस म्हणाले की, “जेल प्रशासनातील काही लोक आरोपींचे बिल होऊन देखील तिथे ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक उद्या वेळ मागितली आहे. उद्या नाही मिळाली तर परवा बैठक करणार आहे. यावेळी बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित नाही. काही कठोर निर्णय घ्यावे अशी आमची मागणी आहे. जे पत्र दिले आहे त्यात पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. काही पोलीस पक्षाच्या नेत्यांसाठी राबतात, त्यांना बाहेर काढणं गरजेचे आहे,” असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.