वडगावमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये एनसीपी उमेदवारांचा प्रचार सुरु केला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Local Body Elections 2025 : वडगाव मावळ : वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच पक्षांचा प्रचार वेग घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज भव्य जल्लोषात शुभारंभ झाला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे यांच्यासह सर्व 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत प्रचारयात्रेला प्रारंभ केला.
यानंतर पंचमुखी मारुती मंदिरापासून पंचायत समिती चौकापर्यंत भव्य पायी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, पक्षाचे झेंडे, घोषणाबाजी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती यामुळे परिसर दणाणून गेला. स्त्री-पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी हजेरी पाहायला मिळाली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विकासावर जनता शिक्कामोर्तब करेल” — आमदार सुनील शेळके
प्रचाराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचार मोहीमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधत गेल्या पाच वर्षांत वडगाव शहरात झालेल्या विकासकामांचा उल्लेख केला. आमदार सुनील शेळके म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वडगावच्या सर्व प्रभागांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणांचा विकास या सर्व क्षेत्रांत लक्षणीय कामे झाली आहेत तसेच लोकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
जनता विकासाला मत देईल. या निवडणुकीत राष्ट्रवादी-आरपीआय गटाचे सर्व 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असे देखील आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेशआप्पा ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादीचे विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, साहेबराव कारके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अतुल राऊत, तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीच्या प्रचारला रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात
वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्यासह 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेत आणि नारळ फोडून प्रचार मोहिमेला प्रारंभ झाला. त्यानंतर खंडोबा मंदिरापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि शेकडो कार्यक्रमांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. हजारो महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती ही या रॅलीची खास वैशिष्ट्य ठरली.






