मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा करत माध्यमांशी संवाद साधला (फोटो - सोशल मीडिया)
CM Fadnavis Kolhapur Visit: कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौरा केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र निवडणुकीच्यापूर्वी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार, पत्ता चुकीचा असे अनेक प्रकार घडले असल्याचा आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार असा प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ. तिन्ही पक्ष आपापल्या परीने त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत. कुठं युती झाली नाही तरी आमची पोस्टपन युती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देतील.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनही पक्ष एकत्रित लढतील की नाही याप्रश्नावर स्पष्ट मत मांडलं.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहे. चार दिवसांच्या या दौऱ्यामध्ये ते शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन त्यांच्या व्यथा जाऊन घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा देखील साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, “पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा मला आनंद असल्याचा चिमटा त्यांनी काढला. उद्धव ठाकरे हे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाही. विकासावर त्यांचे एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा,” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मतदार याद्यांमधील घोळ सुधरवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. त्यावर आणि सरकारविरोधातील उद्धव ठाकरेंच्या संवाद दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. निवडणुका पुढे ढकलाव्यात असेच अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.






