"स्वत:च्या भावाला पक्षात ठेवून न्याय देऊ शकले नाहीत"; संदेश पारकर यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनतेसमोर जाणार आहे. नितेश राणे स्वतःच्या भावाला आपल्या पक्षात न्याय देवू शकले नाहीत . ते कार्यकर्त्यांचे प्रवेश घेवून काय करणार? त्यांनी आत्मपरीक्षण करावे? आपला भाऊ भाजपा सोडून का गेला? आपला पराभव दिसत असल्याने प्रवेश केलं जातं आहेत. राणे भाजप झाल्याने मूळ भाजपची वाढ खुंटली आहे.गेल्या 35 वर्षात हे राणे मंत्री झाले,मुख्यमंत्री झाले, केंद्रीय उद्योग मंत्री झाले एक तरी उद्योग आणला काय ? राणेंना सत्ता पाहिजे, आपल्या घरातच आमदार,खासदार झाले पाहिजे असल्याचा घाणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदेश पारकर यांनी भाजप प्रवक्ते नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि इतर मंडळी उपस्थित होती. पत्रकारांशी संवाद साधताना संदेश पारकर म्हणाले की , ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानतो.कणकवली विधानसभा मतदारसंघात त्यांनी मला उमेदवारी दिली, या जबाबदारीसाठी मला पात्र समजलं, त्यामुळे येत्या निवडणूकीत पक्षाचा आणि जनतेचा विश्वास सार्थकी ठरवणार आहे, असं पारकर यांनी सांगितलं.
हेही वाचा-अहिल्यानगरमध्ये कायदे सुव्यवस्था धाब्यावर;केडगाव हत्याकांडातील आरोपी संदीप कोतकरांची गावात दहशत
पारकर पुढे असंही म्हणाले की, जिल्ह्याचे माजी खासदार.विनायक राऊत तसंच संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,गौरीशंकर खोत यांचे आभार मानतो. आम्ही सांघिक काम करून विजय मिळवणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून 21 हजारपेक्षा जास्त मताधिक्याने माझा विजय होईल.जिल्ह्यातील लोकांना,शिवसैनिकांना,महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो,29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.
संदेश पारकर म्हणाले की, या मतदार संघात दलित,मराठा,मुस्लिम,धनगर अनेक समाज आहेत,त्यांना आरक्षण मिळाले नाही. महागाई वाढली आहे,त्यावर नियंत्रण करणेसाठी आमचा प्रयत्न असणार आहे.पर्यटन माध्यमातून आर्थिक समृद्धी येण्यासाठी काम केलं जाईल. हिंदू मुस्लिम असा द्वेष निर्माण करायचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.काही नेते हिंदुत्वाचा मुद्दा घेवून फिरत आहेत.आम्ही एकसंघ आहोत,आम्ही सर्व समाज एकत्र आहोत. असं म्हणत त्यांना विरोेधकांना टोला लगावला आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदींना सांघिकपणे काम करणार असल्याचे संदेश पारकर .यांनी सांगितले आहे.