आता माघार नाही ! संदीप कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी उठली; लवकरच शहरात ग्रॅण्ड एन्ट्री
गिरीश रासकर / अहिल्यानगर:
गेल्या चौदा वर्षांपेक्षा जास्त कालावधी राजकारणापासून अलिप्त रहावे लागलेले माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी उठली असून आता ते नगरमध्ये येऊन राजकारणात थेट भाग घेऊ शकतात. या निर्णयामुळे कोतकर समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.एका खुनाच्या आरोपात संदीप कोतकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षा झाली होती. या शिक्षेला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. सध्या संदीप कोतकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व जामिनावर आहेत. मात्र यातील सचिन कोतकर वगळता इतरांना जिल्हाबंदी होती. त्यामुळे संदीप कोतकर जिल्ह्यात येऊ शकत नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी उठली आहे. त्यामुळे आता कोतकर समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
जिल्हाबंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज झालेल्या निर्णयामुळे संदीप कोतकर यांना नगर शहरात प्रत्यक्ष येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चौदा वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते नगरच्या राजकारणापासून अलिप्त आहेत. जिल्हाबंदी हे त्यामागील कारण होते. आता ती अडचण दूर झाल्याने कोतकर समर्थकांत जल्लोषाचे वातावरण आहे. आम्ही निवडणूक लढविणारच, असे त्यांचे बंधू सचिन कोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितले होते. फक्त उमेदवारीबाबत निर्णय नसल्याचे ते म्हणाले होते. स्वतः संदीप कोतकर किंवा त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर उमेदवार असतील, असे ते म्हणाले होते. पक्षाबाबत तेच निर्णय घेतील, असे सांगताना आमची इच्छा तुतारीकडून आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.
.
हेही वाचा- राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ,अजित पवार गट जिल्हाध्यक्षांविरोधात नाराजीचे सूर
निवडणुकीच्या तोंडावर संदीप कोतकर यांचे बंधू सचिन कोतकर यांनी मागासवर्गीय व्यक्तीला शिविगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या संदर्भात सचिन कोतकर यांनी खुलासा केला आहे. क्लिप एेकल्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या आॅडिआेमधील आवाज माझा नाही, मी त्या व्यक्तीला आेळखत नाही आणि असा काहीही प्रकार घडलेला नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती…”, नितेश राणे यांचा घणाघात
माजी महापौर संदीप कोतकर यांनी नगर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्का केला आहे. त्यांचे बंधू सचिन यांनीही तेच सांगितले. मात्र पक्ष कोणता, हे अद्याप निश्चित नाही. नगर मतदारसंघातून उबाठा, कॉँग्रेसमध्येही इच्छूक आहेत. दोन्ही पक्ष जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोतकर यांच्यासह अनेक इच्छूक आहेत. जिल्हाबंदी उठल्याने कोतकर कुटुंब आता इच्छुकांच्या थेट स्पर्धेत आल्याने इतर इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशासाठी कोतकर यांची तयारी झालेली असून फक्त जागा वाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा त्यांना आहे.
ahilyanagar, dandeep kotkar, vidhansabha election, अहिल्यानगर, दानदीप कोतकर, विधानसभा निवडणूक,






