जन सुरक्षा कायदा म्हणजे लोकशाही मार्गाने घेतलेला ठोस निर्णय; फडणवीस स्पष्टच बोलले
Horn Free Mumbai : महाराष्ट्र सरकारने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध धार्मिक स्थळांवरून एकूण ३,३६७ भोंगे हटवण्यात आले असून, यापैकी १,६०८ भोंगे एकट्या मुंबईतून काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (11 जुलै) विधानसभेत याबाबत सविस्तर माहिती दिली.’ ही कारवाई पूर्णतः शांततेत पार पडली असून कुठलाही सांप्रदायिक वा धार्मिक वाद निर्माण झालेला नाही.’असेही त्यांनी स्पष्ट केलं.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू असून, मुंबई हे राज्याचे पहिले भोंगेमुक्त शहर ठरले आहे. याच धर्तीवर राज्यातील इतर शहरेही भोंगेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. राज्यात भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर अनेक वर्षांपासून तक्रारी होत होत्या. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत धार्मिक स्थळांवर भोंग्यांचा वापर करण्यास मनाई आहे. तसेच, दिवसात ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल ही ध्वनी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुंबई शहरात १,६०८ भोंगे काढण्यात आले असून, यामध्ये १,१४९ मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च, आणि ४ गुरुद्वारे यांचा यांच्यासह १४८ इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
Maharashtra Band: ‘भारत बंद’ पाठोपाठ आता ‘महाराष्ट्र बंद’; आहार संघटनेकडून बंद’ची हाक
मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की, राज्यातील एकूण ३,३६७ धार्मिक स्थळांवरून भोंगे काढण्यात आले आहेत. पुढे जर कोणत्याही भागात अनधिकृत भोंगे आढळून आले, तर स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल. तसेच प्रत्येक पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
याशिवाय, मुंबईबाहेर राज्यातील १,७५९ धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवण्यात आले असून या कारवाईवर आधारित पूर्तता अहवालावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. एप्रिल आणि मे २०२५ या दोन महिन्यांमध्ये ध्वनिप्रदूषणाविरोधात एकूण ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सव काळात परवानगी घेऊन आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून त्रास होतो, अशी तक्रार आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नियमात राहून साजरे होणाऱ्या उत्सवांमध्ये कोणत्याही मंडळाला त्रास होणार नाही. पोलिसांनी नाहक अडथळा करू नये, यासाठी स्पष्ट सूचना दिल्या जातील.”