मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (फोटो- सोशल मिडिया)
जम्मू काश्मीरमध्ये पार पडली राज्यसभा निवडणूक
4 पैकी एका जागेवर भाजपचा विजय
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता
जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच राज्यसभेची निवडणूक पार पडली. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत आलेल्या निकालाने खळबळ उडाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 4 जागांवर निवडणूक पार पडली. दरम्यान 4 पैकी 3 जागा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जिंकल्या आहेत. तर एक जागा भाजपने जिंकली आहे. दरम्यान या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत 4 पैकी 3 जागा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जिंकली आहे. तर एक जागा भाजपने जिंकली आहे. भाजपकडे एकूण 28 आमदार आहेत. या निवडणुकीत भाजपला 32 मते पडली आहेत. अतिरिक्त 4 मते भाजपला कुठून मिळाली अशी चर्चा आता राजकीय विश्वात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सत शर्मा विजयी झाले. इतर भाजपच्या उमेदवारांना 28 मते मिळाली. मात्र सत शर्मा यांना 32 मते मिळाली. जम्मू काश्मीरमधील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला 32 मते पडल्याने क्रॉस वोटिंग झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाष्य केले आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “पक्षाच्या एजंटनी सर्व मतपत्रिकांची तपासणी केली आहे. आमच्या पक्षातील कोणत्याही आमदाराने क्रॉस वोटिंग केलेले नाही. आपली स्वतःची मते अवैध ठरवणारे ते कोण आहेत? हिम्मत असेल तर भाजपसोबत जाण्याची भूमिका जाहीर करावी. ज्यांनी असे केले त्यांनी आपले आत्मे भाजपला विकले आहेत.”
Jammu-Kashmir च्या मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी
काही दिवसांपूर्वी लेह-लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले. आता जम्मू काश्मीरला देखील स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते अनंतनागमध्ये बोलत होते.
‘आपल्यामधले अंतर कमी करायचे असेल तर…’; Jammu-Kashmir च्या मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “जम्मू काश्मीर आणि दिल्लीमधील अंतर कमी करायचे असेल तर, केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरला लवकरच स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल होईल अशी मला अपेक्षा आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “सध्या निवडून आलेल्या सरकारचे अनेक सांविधानिक आणि प्रशासकीय संस्थांवर नियंत्रण नाही. महाधिवक्ता रिक्त आहे. राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यास सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास अधिकार मिळतील. आमचे सरकार 5 वर्षांच्या अजेंड्यावर काम करत आहे.”






