Maharashtra Municipal Election Result 2026: Live results (Credit- AI)
16 Jan 2026 09:04 AM (IST)
बीएमसी निवडणुकीसाठी गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. आज 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमजोणीची प्रक्रिया सुरु होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 23 मतमोजणी कक्षावर सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्याला महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजूरी दिली आहे.
16 Jan 2026 08:54 AM (IST)
अखेर हो नाही म्हणता म्हणता नवी मुंबई पालिकेची निवडणूक संपन्न झाली असून मुख्य लढत भाजपा व शिवसेनेच राहणार असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवी मुबाईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवी मुंबईत यंदा शिवसेना ही नाईकांच्या सत्तेच्या म्हणजेच भाजपाच्या तोडीस तोड पोहोचलेली दिसून आली. हा कदाचित शिवसेनेसाठी मानसिकदृष्ट्या विजय म्हणावा लागले असे तज्ञांचे म्हणणे आहे.
16 Jan 2026 08:44 AM (IST)
आज जाहीर होणाऱ्या निकालांकडे सर्वांचे लागले आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोलने असा अंदाज वर्तवला आहे की, एक्झिट पोलने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपाला निर्विवाद वर्चस्व मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
16 Jan 2026 08:34 AM (IST)
प्रभाग क्रमांक 201 मध्ये शिवसेना (उबाठा) च्या उमेदवार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुप्रिया मोरे यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. तर या प्रभागामध्ये काँग्रेसने पल्लवी मुणगेकर यांना उमेदवारी दिली होती.
16 Jan 2026 08:24 AM (IST)
नागपूर : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (दि.15) मतदान पार पडले. मतदारांमध्ये कुठं उत्साह तर कुठं निरूत्साह दिसून आला. नागपुरात महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये सकाळपासून निरुत्साह दिसत होता. तो दुपारपर्यंत कायम होता. मात्र, सायंकाळी अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. चंद्रपुरात दोन महिला उमेदवारांच्या पतीमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्या लाठीमार करावा लागला.
16 Jan 2026 08:13 AM (IST)
मुंबई : पुणे, नाशिक, नागपूर, मुंबईसह 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. राज्यातील अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आज महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील. यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अनेक भागांतील निकाल हळूहळू समोर येतील.
16 Jan 2026 08:00 AM (IST)
Thane Election Result 2026 Live : ठाणे महानगरपालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी काल (गुरुवार) उत्साहात मतदान पार पडले. निवडणूक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ठाण्यात एकूण ५५.५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मतदान प्रक्रियेत ४,८३,६९८ पुरुष, ४,३३,३८५ महिला आणि ४० इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ६४१ उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होईल.
मतदानाची सविस्तर आकडेवारी:
एकूण मतदान: ५५.५९%
एकूण मतदार: १६,४९,८६९ (८.६३ लाख पुरुष, ७.८५ लाख महिला)
प्रत्यक्ष मतदान केलेले नागरिक: ९,१७,१२३
मतदान केंद्रांची संख्या: २,०१३
16 Jan 2026 07:50 AM (IST)
BMC Municipal Election Result 2026: महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता 'रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स'चे एक्झिट पोल समोर आले आहेत. या अंदाजानुसार, राज्यात महायुती मोठी बाजी मारण्याची शक्यता असून २९ पैकी तब्बल २७ महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येण्याचे संकेत आहेत.
कसे आहेत एक्झिट पोलचे निष्कर्ष
महायुतीचे वर्चस्व: राज्यातील एकूण २९ महापालिकांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती सत्ता काबीज करेल.
काँग्रेसला केवळ दोन ठिकाणी संधी: या एक्झिट पोलनुसार, केवळ लातूर आणि कोल्हापूर या दोनच महापालिकांमध्ये काँग्रेसला विजयाची किंवा सत्ता स्थापनेची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईतही महायुतीची हवा: मुंबईसह पुणे, ठाणे आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांतही महायुतीचेच पारडे जड असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
रुद्र रिसर्चचा अंदाज: रुद्र रिसर्चने राज्यातील सर्व २९ महापालिकांच्या मतदारांचा कल अभ्यासून ही आकडेवारी मांडली आहे. या अंदाजामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर विरोधकांसाठी हा कौल चिंतेचा विषय ठरू शकतो. प्रत्यक्ष निकाल आज (१६ जानेवारी) दुपारपर्यंत स्पष्ट होतील.
16 Jan 2026 07:35 AM (IST)
BMC Election Result 2026 Live : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मुंबईत भारतीय जनता पक्ष (भाजप) ८४ जागांसह नंबर वनचा पक्ष ठरताना दिसत आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळणाऱ्या अंदाजित जागांमुळे महायुती मुंबईत 'मॅजिक फिगर' (बहुमताचा आकडा) सहज ओलांडण्याची चिन्हे आहेत.
एक्झिट पोलचा प्रामुख्याने कल (अंदाजित जागा):
भाजप ८४ (मागील वेळेपेक्षा २ जास्त)
शिवसेना (ठाकरे गट) ६५
शिवसेना (शिंदे गट) ३५
मनसे १०
16 Jan 2026 07:25 AM (IST)
Kolahpur Election 2026: राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले. राज्यात सर्वत्रच मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे दिसून आले आहे. मतदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष, महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून करण्यात आले होते. दरम्यान मतदान झाल्यावर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार कोल्हापुरात देखील कोणाची सत्ता येणार यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपला 29 न ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 18 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 9 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉँग्रेसला 20 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. मनसेला 1 आणि ठाकरे गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
16 Jan 2026 07:18 AM (IST)
Axis My India चे एक्झिट पोलचे अंदाज मुंबईत कोणाला किती जागा मिळणार
BMC - Exit Poll – Seat Share - Vote Share (%)#BMCElections2026#ExitPoll2026#AxisMyIndia pic.twitter.com/xE535uMm3B
— Axis My India (@AxisMyIndia) January 15, 2026
16 Jan 2026 07:12 AM (IST)
PMC Election Result 2026 Live : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, त्यापूर्वी समोर आलेल्या विविध एक्झिट पोलने पुण्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वर्चस्व राहण्याचे संकेत दिले आहेत. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप ७० जागांसह पुण्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
भाजप- ७०
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- ५५
शिवसेना (शिंदे गट)- १२
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- १०
काँग्रेस - ०८
मनसे - ०२
इतर-०३
16 Jan 2026 07:06 AM (IST)
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी आज फैसला होणार असून सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण ३८ प्रभाग असून त्यापैकी ३७ प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग तीन सदस्यीय आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून शहराच्या विविध १० झोनमध्ये मतमोजणी केंद्रे उभारली आहेत.
एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे EVM साठी २० आणि टपाल मतदानासाठी ४ टेबल ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलावर एक पर्यवेक्षक आणि एका सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागाच्या क्रमवारीनुसार एकेका प्रभागाचा निकाल जाहीर केला जाणार असल्याने पूर्ण चित्र स्पष्ट होण्यास काहीसा उशीर होण्याची शक्यता आहे.
16 Jan 2026 06:59 AM (IST)
PMC Election Result 2026 Live : पुणे महानगरपालिकेच्या १६३ जागांसाठी काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून शहरात एकूण ५२.४२ टक्के मतदान झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीत ५५.५६ टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का ३.५० टक्क्यांनी घसरला आहे.
निवडणुकीची महत्त्वाची आकडेवारी:
एकूण मतदान: ५२.४२%
मतदान केलेले नागरिक: १८ लाख ६२ हजार ४०८ (एकूण ३५ लाख मतदारांपैकी)
एकूण जागा: १६३
२०१७ मधील मतदान: ५५.५६%
16 Jan 2026 06:57 AM (IST)
पुणे-पिंपरी चिंचवड: येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपसमोर उभे केलेले कडवे आव्हान कोणाच्या फायद्याचे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कोल्हापूर: काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, कोल्हापूरची सत्ता राखण्यात ते यशस्वी होतात का, याची चर्चा रंगली आहे.
सांगली: विशाल पाटील, विश्वजीत कदम आणि जयंत पाटील या त्रयीने एकत्र येत दिलेल्या विजयाच्या नाऱ्याचा प्रभाव निकालात दिसणार का, याची उत्सुकता आहे.
Municipal Election Result 2026 Live : मुंबई आणि पुण्यासह राज्यातील २९ महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) विक्रमी उत्साहात मतदान पार पडल्यानंतर, आज संपूर्ण राज्याचे लक्ष निकालांकडे लागले आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत राज्यातील महापालिकांवर कोणाचा झेंडा फडकणार, याचे चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकांमध्ये राज्यात अनेक नवी समीकरणे पाहायला मिळाली. युत्या आणि आघाड्यांच्या खिचडीमुळे मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधील निकालांचा परिणाम राज्याच्या आगामी राजकारणावर होण्याची शक्यता आहे.






