देवेंद्र फडणवीस यांचा न ऐकलेला किस्सा
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झालेत. 288 पैकी 132 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. ते 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदान येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राजकारणाचा वारसा मिळाला. त्यांचे वडील गंगाधर राव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते. 1995 मध्ये, जेव्हा भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांच्या काकूही कॅबिनेट मंत्री झाल्या. वडिलांमुळेच ते शालेय जीवनापासून राजकारणात आले. देवेंद्र 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सर्वात तरूण महापौर
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रथम नागपुरातील भाजप संघटनेत प्रभाग निमंत्रक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि 1992 मध्ये नागपूर महापालिका निवडणुकीत विजयी होऊन ते नगरसेवक झाले. वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे महापौर बनून विक्रम केला. त्यावेळी ते देशातील सर्वात तरुण महापौर होते. 1999 मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार झाले.
महायुतीचा ‘हा’ संभाव्य फॉर्म्युला ठरतोय चर्चेचा विषय; शिवसेनेला गृहखातं नाहीच पण…
फडणवीसांचा मॉडेलिंगचा किस्सा
हा किस्सा 2006 या वर्षातील घडलेला आहे. नागपूर शहरातील अनेक चौकात कपड्याच्या दुकानाची जाहिरात करणारे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यात एका मॉडेलचे छायाचित्र होते. ते मॉडेल दुसरे कोणी नसून देवेंद्र फडणवीस होते. 2006 पर्यंत फडणवीस हे सात वर्षे आमदार झाले होते. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून त्यांच्या मॉडेलिंगची बातमी दिल्लीतील अटलबिहारी वाजपेयींपर्यंत पोहोचली होती. दरम्यान एका प्रसंगी फडणवीस जेव्हा दिल्लीत अटलजींना भेटायला आले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे हसतमुखाने पाहिलं आणि म्हणाले, ‘या या, मॉडेल आमदार जी.’
गाण्याचेही दर्दी
फडणवीस हे उत्तम वक्ता तर आहेतच, त्यासह उत्तम राजकारणी आहेत. मात्र अनेकांना ही गोष्टही माहीत आहे की त्यांना गाण्यात विशेष स्वारस्य आहे. काही काळापूर्वीच त्यांना गाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. इतकंत नाही तर त्याच्या या स्वारस्यामुळे पत्नी अमृता फडणवीस यांनाही ते नेहमीच गाण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतात. राजकारणातून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा फडणवीस गाण्याचे कार्यक्रम आवर्जून पाहतात वा उपस्थित राहतात.
महायुतीच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला?, भाजपकडे असणार तब्बल इतकी प्रमुख खाती? गृहमंत्रिपद जाणार या पक्षाकडे
व्यक्तिगत जीवन
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम केला आहे. 2005 मध्ये गायिका आणि बँकर अमृता रानडे यांच्याशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव दिविजा आहे. तर त्यांची पत्नी अमृता फडणवीस या बँकर असून सध्या समाजसेविकेचे काम करतात. 2019 नंतर मी पुन्हा येईनचा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि आता अखेर त्यांचे स्वप्नं पूर्ण झाले असून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे.