महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वरिष्ठांनी बुधवारी सायंकाळी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा केली. जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग नगरपालिका असणाऱ्या सातारा नगरपालिकेत प्रत्येकी १५ व मित्र पक्षांना पाच असा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याची चर्चा आहे.साताऱ्याचे डॉक्टर संदीप काटे यांना नगराध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली असून जवळपास त्यांचे नाव निश्चित मानले जात आहे. बुधवारी रात्री उशिरा डॉक्टर काटे यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी कमराबंद खलबते केली. या बैठकीला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नितिन बानगुडे पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रीय काँग्रेसच्या रजनी पवार आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील नवनगरपालिका व मेढा नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीने एकत्रित लढायची ठरलं असून कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या न यावर चर्चा सुरू आहेत. ज्या पालिकेत ज्या न पक्षाचा वरचष्मा आहेत, तेथे जास्तीत जास्त जागा त्या पक्षाने लढवायच्या की नाही, याविषयी रात्री उशिरापर्यंत चाचणी सुरू होती. सातारा नगरपालिका मात्र भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने महाविकास आघाडीने सुद्धा तेथे मजबूत रणनीची आखण्यास प्रारंभ केला आहे. नाराज गटाला पकडून जास्तीत जास्त सक्षम उमेदवार देण्याच्या दृष्टीने रणनीती सुरू झाली आहे. साताऱ्यात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन प्रत्येकी १५ जागा आणि मित्र पक्षांना पाच जागा देऊन संपूर्ण पॅनेल महायुतीच्या विरोधात उभे करायचे, याबाबत निर्णय रात्री उशिरा झाल्याचे खात्रीलायक वृत्तांची माहिती आहे. शुक्रवार, शनिवार ही दोनच दिवस कामकाजाचे असून त्या दिवशी अर्ज भरले जातील आणि पक्षाचा एबी फॉर्म बंडखोरी टाळण्याच्या दृष्टीने सोमवारी दिला जाईल, अशी चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. दुपारी 3 पासून राष्ट्रवादी भवनमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबर, पत्रकार सुजित आंबेकर, शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद काटकर, संतोष उर्फ नाना इंदलकर इत्यादी लोकांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉक्टर संदीप काटे यांचे सुद्धा नाव पुढे आले असून डॉक्टर काटे यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी अर्धा तास कमरा बंद चर्चाकेली. या चर्चेमध्ये एकूणच तयारीचा आढावा घेण्यात आला. सातारा शहरात महाविकास आघाडीला किती पाठिबा मिळू शकेल. एकूण मतदार संख्या, प्रभाग निहाय महाविकास आघाडीची मांडणी, जनतेसाठी तयारकरावयाचा जाहीरनामा इत्यादी विषयांवर शशिकांत शिंदे यांनी प्रत्येक उमेदवाराशी सखोल चर्चा केल्याची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटाचीसुद्धा तयारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बंडखोरांना सध्या तरी यांचवण्यात संपर्क सूत्रांना यश आले आहे. काही नाराज अद्यापही तळ्यात मळ्यात असल्याने राष्ट्रवादी गटाकडून कडवी लढत दिली जाणार का याविषयी साशंकता आहे. वादग्रस्त ठरलेल्या काही निवडीवरून शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लिबखिंड परिसरात गोपनीय ठिकाणी ठाकरे गटाच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. येत्या दोन दिवसात ठाकरे गटाच्या सुद्धा नगरसेवक पदाच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुलाखती गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होत आहेत, त्यामुळे येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीची सर्व पक्षांची नावे अंतिम होऊन यादी जाहीर केली जाणार आहे.
Ans: सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येकी १५ जागा आणि मित्र पक्षांना ५ जागा असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे.
Ans: महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.
Ans: कारण ही पालिका BJP साठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आघाडीने मजबूत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.






