(फोटो- टीम नवराष्ट्र)
Marathi Breaking news live updates : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर प्रशांत कोरटकर याच्याबाबत राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्याच्या अटकेची मागणी केली जात होती. सुरुवातीला त्याला देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात आला असून त्याला सोमवारी तेलंगणा येथे कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळीच त्याला कोल्हापूरात आणण्यात आले आहे. प्रशांत कोरटकर याला आता कोल्हापुरात आणण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळी राजवाडा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
25 Mar 2025 05:03 PM (IST)
Rishabh Pant सोबत KL Rahul ची पुनरावृत्ती? डिसीविरुद्धच्या पराभवाने नाराज संजीव गोएंकाकडून कर्णधाराची खरडपट्टी..; पाहा Video#RishabhPant #KLRahul #SanjeevGoenkahttps://t.co/eNhA497wVm
— Navarashtra (@navarashtra) March 25, 2025
25 Mar 2025 04:59 PM (IST)
Kunal Kamra : कामरा है की मानता नही! मुंबई पोलिसांना थेट पत्रच लिहिलं; हजर होण्यासाठी मागितली एक…#KunalKamra #Controversy #MarathiNewshttps://t.co/BUyUMGU5RX
— Navarashtra (@navarashtra) March 25, 2025
25 Mar 2025 04:55 PM (IST)
Kalyan | कल्याण जवळील उंबर्डे डम्पिंग ग्राऊंडला आग#Kalyan #Fire #MarathiNews pic.twitter.com/203IIn20se
— Navarashtra (@navarashtra) March 25, 2025
25 Mar 2025 04:54 PM (IST)
Disha Salian case : दिशा सालियनचे वडील मुंबई आयुक्तांच्या भेटीला! आदित्य ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ होणार?#DishaSalianCase #AdityaThackeray #PoliticalNews #MarathiNewshttps://t.co/kcoqa3ipZn
— Navarashtra (@navarashtra) March 25, 2025
25 Mar 2025 03:12 PM (IST)
पुण्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे कचऱ्यात 6 ते 7 अर्भक आढळली आहेत. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ही अर्भक सापडल्याची माहिती मिळाली असून, या घटनेमुळे दौंडच्या बोरावकेनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही अर्भक कुठून आली आणि या प्रकरणामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
25 Mar 2025 03:07 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसला आहे. मुंबईहून कोल्हापूर-कागलकडे जाणारी एसटी बस (एमएच ४० एचक्यू ६३०५) शिरवळ येथे अचानक बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना बसला धक्का देत ती सुरू करण्याचा प्रयत्न करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर
25 Mar 2025 02:55 PM (IST)
बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. दिशाची आत्महत्या नसून तिचा खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यानंतर, काही वेळापूर्वीच ते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.
25 Mar 2025 02:38 PM (IST)
सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता खासगी इसमाच्या सांगण्यावरून स्वीकारताना सापडले आहेत. कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार व बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली.
25 Mar 2025 02:31 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी कोरटकरची चौकशी करण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
25 Mar 2025 01:00 PM (IST)
इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वापरणाऱ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच WhatsApp वर फीचर्सची रांग लागणार आहे. कंपनी त्यांच्या आगामी फीचर्सवर काम करत आहे. हे फीचर्स लवकरच त्यांच्या युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. WhatsApp मध्ये दोन नव्या फीचर्सचा समावेश केला जाणार आहे. यातील पहिलं फीचर म्हणजे मोशन फोटो संबंधित असणार आहे आणि दुसरं फीचर स्पॉटीफाय संबंधित असणार आहे.
25 Mar 2025 11:44 AM (IST)
पंढरपूरमध्ये शालेय पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक शाळेत गोरगरीब विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. या पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर 10 विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाब होण्याचा प्रकार घडला. अर्धवट शिजवलेला भात, अस्वच्छ तांदूळ, उग्र वास आणि स्वच्छतेच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी संबंधित बचत गटावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
25 Mar 2025 10:55 AM (IST)
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर शिंदे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी कामराने सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी केली आहे. मात्र, कुणाल कामराने यावर ठाम भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला आहे.
25 Mar 2025 10:49 AM (IST)
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले. तर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेची सर्व जबाबदारी ही राज्य मंडळाकडेच असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नव्या शैक्षणिक वेळापत्रकासंदर्भात भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
25 Mar 2025 10:47 AM (IST)
महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा वक्तव्य आणि भाषणांमधून अवमान केला जात आहे. यावर सरकारकडून वचक बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यामध्ये महापुरुषांचा अपमान करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्यात येणार आहे. यासाठी विरोधी नेत्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.
25 Mar 2025 10:44 AM (IST)
प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल आणि इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यापासून तो फरार होता. मात्र प्रशांत कोरटकर कॉंग्रेस नेत्याच्या घरी लपून होता असा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे.