खाटीक समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आमदार अर्जुन खोतकर यांच्याविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झाला (फोटो - सोशल मीडिया)
Arjun Khotkar Atrocity case : बारामती : शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अर्जुन खोतकर यांनी एका समुदायाच्या विरोधामध्ये वक्तव्य केले होते. यामुळे बारामतीमध्ये अर्जुन खोतकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. त्यानंतर अखेर भिगवण पोलीस ठाण्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्याविरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. खाटीक समाजाबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे खाटीक समाजाकडून आक्रमक भूमिका घेतली जात होती. बारामती येथील खाटीक समाजाचे कार्यकर्ते करण सुनील इंगुले यांनी याबाबतची फिर्याद भिगवण पोलिस ठाण्यात दिली. त्या फिर्यादीवरून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात इंदापूर येथील भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर खाटीक समाजाने नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. बारामतीसह संपूर्ण राज्यातील विविध भागामध्ये खाटीक समाजाने आंदोलन केले. आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. बारामती येथील खाटीक समाजाचे कार्यकर्ते करण सुनील इंगुले यांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार अर्जुन खोतकर यांनी सलग दोन दिवस खाटिक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या विधानामुळे खाटिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी आमदार खोतकर यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर करण इंगुले यांनी काही दिवस उपोषणही केले होते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवरही कमालीचा दबाव होता. अखेर भिगवण पोलिसांनी अर्जुन खोतकर यांच्याविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिका मांडली आहे. मराठा आंदोलकांकडून रस्त्यावर कबड्डी, खो खो खेळली जात आहेत. तर भररस्त्यात अंघोळ केली जात आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रचंड अस्वच्छता देखील केली जात आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वी बरेच मोर्चे काढले आहेत. त्यांची चर्चा ही देशभर झाली आणि कुठेही गालबोट लागले नाही. कारण असे झाले तर समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते अडवणे किंवा रिर्झेव बॅंकेसमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळणार नाहीये, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.