एनसीपी अमोल मिटकरी यांची संभाजी भिडे गुरुजी सांगली कुत्रा हल्ल्यावरुन पोस्ट (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे Sambhaji bhide यांचा कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर सांगलीमध्ये भटक्या कुत्र्याने हल्ला केला. सोमवारी रात्री कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायावर चावा घेतला. शहरातील माळी गल्लीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालयात संभीजी भिडे गुरुजींवर उपचार करण्यात आले. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
संभाजी भिडे यांच्या कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे सांगली महानगरपालिकेला जाग आली. शहरातील विविध भागात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावर आता विरोधी राजकीय नेत्यांनी टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार गटाचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी देखील टोला लगावला आहे. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन संभाजी भिडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यावरुन हास्यास्पद टीका केली आहे. मात्र त्यांनी संभाजी भिडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अमोल मिटकरी यांनी लिहिले आहे की, “त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? …..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का? असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना?
…..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का? — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 16, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शिकवायला सुरुवात केली. त्यांचे सर्व पक्षांतील राजकारण्यांशी संबंध होते. पण ते राजकारणात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी भिडे यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडेंना गुरुजी म्हणतात. उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजी भिडे यांच्याशी चांगले संबंध होते. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम आणि राष्ट्रवादी नेते आर.आर. पाटील हे त्यांच्याशी जवळचे नाते राहिले आहे.