विधानसभेतील 'ते' प्रकरण अंगलट; रोहित पवारांविरोधात FIR दाखल
Rohit Pawar Marathi News : मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये हिंदी भाषा सक्ती आणि आरक्षण असे अनेक मुद्दे गाजणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये गोंधळ झाल्याचे देखील दिसून आले होते. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळामध्ये उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी महायुतीच्या सरकारवर योजनांवरुन जोरदार निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे पैसे दिले जात नसल्यामुळे टीका केली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, ठया सरकारच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करू, दिवसा लाईट देऊ अशा विविध घोषणा केल्या. पण सरकार आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांला विसरले आहात, लाडक्या बहिणींना विसरले आहात, युवांना विसरलेले आहात. ते जे विसरले आहेत त्यांना आठवण करून देण्यासाठी गजनी सरकारला आठवण करून देण्यासाठी हा फोटो घेऊन मी आलेलो आहे,ठ असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे रोहित पवार म्हणाले की, अपेक्षा करतो की आज कृषी दिन आहे, या दिवसानिमित्त तरी हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये सुरु असलेल्या आंदोलन ठिकाणी देखील भेट दिली आहे. त्यांनी कंत्राटी आय.टी. असिस्टंट कर्मचारी सं. गा. यो. विभाग यांच्याकडून वेतनाबाबतच्या प्रश्नासाठी बेमुदत कामबंद आंदोलनस्थळी भेट दिली. याचबरोबर ‘खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघा’च्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर हुंकार आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी देखील रोहित पवार यांनी भेट दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारी चर्चेत आली आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. याचे फोटो देखील व्हायरल झाले असून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले की, ठधनंजय मुंडेंसोबत देखील त्या व्यक्तीचा फोटो आहे. फोटोवर आपण काही बोलू शकत नाही. सरकार तुमच्याकडे आहे, पोलीस तुमच्याकडे आहेत, जी शहानिशा करायची आहे तुम्ही करा. संदीप क्षीरसागर हे आज नाहीतर उद्या मुंबईत येतील आणि जे घडलं आहे ते मीडियासमोर सांगतील,ठ असे देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.