पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; मुख्यमंत्र्यांसह परराष्ट्रमंत्री, रेल्वेमंत्रीही राहणार हजर (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) पुणे दौऱ्यावर येणार होते. शहरातील महत्त्वकांशी अशा नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप श्रेष्ठी हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. मागील दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यामध्ये येणार होते. त्यामुळे महायुतीसाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत होता. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर परशूराम महाविद्यालय मैदानावर होणार होता. आता मात्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस.पी. कॉलेजवर जाहीर सभा होणार होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुणे शहराला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आला असून याआधी सभेचे ठिकाण बदलण्याची तयारी सुरु होती. आता मात्र दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रमच…
पुणे शहरामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. काल सायंकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना अगदी नदीचे स्वरुप मिळाले होते. वाढत्या पावसामुळे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली. पुण्यामध्ये सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढतो आहे, याचा फटका आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला देखील बसला आहे. सध्या पावसाची एकूणच परिस्थिती लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. एस.पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. या ठिकाणी मैदानावर मोठा चिखल झाला आहे. तसेच यामुळे नागिरकांची देखील मोठी गैरसोय सभेला झाली असती. यामुळे प्रशासनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याचे सांगितले आहे.
भाजपकडून जोरदार तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये पूर्वनियोजित दौरा होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. शहरातील विविध भागांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे पोस्टर आणि बॅनर्स झळकत होते. त्याचबरोबर नव्याने तयार करण्यात आलेली मेट्रो स्टेशन देखील सजली होती. स्वारगेट, मंडई आणि सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनला फुलांनी सजवण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा पदाधिकारी आणि इच्छुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यावर आणि पदाधिकाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.