सांगलीवाडी येथील प्रभाग 13 मध्ये सर्वात कमी नोटाला मतदान पडले आहे. येथे 346 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. त्यापैकी अभिजित कोळी व महाबळेश्वर चौगुले या लढतीत आवघे 61 मतदान नोटाला आहे. हे दोन्ही उमेदवार राजकीय पक्षांनी चांगले दिले होते. त्यामुळे या ठिकाणी मतदारांनी दाखवून दिले आहे. की योग्य उमेदवारांना आम्ही मतदान करतो.
अपात्र उमेदवार पक्षीय राजकारणातून लादले.गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार,गतवेळी नगरसेवक असतना निष्क्रय.
विकास कामांबाबत असमाधान,88 नोटांना मतदान देण्यामध्ये तरुण मतदारांचा अधिक कल आहे. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मागील निवडणुकीच्या तुलनेत नोटा मतांचे प्रमाण वाढले आहे, ही बाब लोकशाहीतील जागरूकतेचे द्योतक मानली जात असली तरी, भविष्यात पक्षांनी आत्मपरीक्षण करून विश्वासार्ह उमेदवार देणे गरजेचे ठरणार आहे.
– अॅड. अभिषेक खोत
पारंपरिक पक्षांच्या उमेदवारांबाबत नाराजी, गुन्हेगारी, विकासकामांबाबत असमाधान आणि स्थानिक प्रश्नांकडे झालेले दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वाधिक 3 हजार 11 मतदारांनी नोटाला मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर मतदारांनी उमेदवारांऐवजी नोटाचा बटण दाबल्याची चर्चा तरुणांमध्ये झाली होती, त्याचा प्रत्यय मतमोजणीत दिसून आला आहे. या प्रभागात भाजपा आणि शिवसेनेने निवडणूक लढविली होती. यामध्ये 3 जागी भाजपा आणि एका ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र या प्रभागात झालेले नकारत्मक मतदान विचार करयला लावणारे आहे. मिरज शहरात असणाऱ्या प्रभाग 4 मध्ये देखील 2 हजार नागरिकांनी नोटाला मतदान केले.






