मयत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय मुंडेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट (फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली असून तेव्हापासून बीडसह राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर परभणीमध्ये देखील सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरुन महायुती सरकारवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यानंतर आता राज्यामध्ये नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
बीडमध्ये हत्याकांड होऊन 20 दिवस उलटून गेले असले तरी देखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपी वाल्मिक कराड याला देखील अटक न झाल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था नसल्याची टीका सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देखील सुरेश धस हे चर्चेत आले होते. त्यानंतर आता बीड हत्या प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुरेश धस हे या हत्याकांडाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीड हत्या प्रकरणावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आक्रमक भूमिका घेत आहेत. सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये देखील मनोज जरांगे पाटील सहभागी झाले होते. यानंतर आता मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. धनंजय देशमुख यांनी अंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये साधारणतः तासभर चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना धीर दिला. तसेच न्याय न मिळाल्याच पुढे कोणती पाऊले उचलली जातील याबाबत देखील चर्चा करण्यात आली.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आरोपीला अटक झाली पाहिजे. तो माणूस साधा असो की मंत्री असो किंवा आमदार, खासदार असो. एवढ्या जणांना पाठबळ देणारा कोण आहे? यांचे फोन झालेले आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे. तरी त्याचं नाव नाही असं काही जण म्हणत आहेत. त्याचं नाव नाही हे म्हणणारे तुम्ही कोण? मदत करणारे सगळे अटक झाले पाहिजे. नाहीतर सरकारला हे सोपे जाणार नाही. नाहीतर आम्ही पूर्ण राज्यात आंदोलन सुरु करु. आम्हाला संतोष देशमुख यांचे सर्व आरोपी अटक झालेले पाहिजेत. आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झालेली पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा अटक झाले पाहिजे. ते कोणत्याही पदावर असतील तरी सुद्धा त्यांना अटक झाली पाहिजे. कोणाला सुट्टी द्यायची नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.