पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ
पुणे: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड आज सरेंडर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंतच्या सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासातून तो महाराष्ट्रातच असून त्याची 100हून अधिक बँक खातील गोठवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो सरेंडर करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आज ११ वाजता वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करू शकतो, अशी शक्यता आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड फरार आहे. विशेष म्हणजे तो मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा आरोपही देशमुख यांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना दुसरीकडे बीड पोलीसदेखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Santosh Deshmukh Murder : अंजली दमानिया या रिचार्जवर चालणाऱ्या ताई
वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले आहे. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले आहे. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पावण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी शक्यता आहे.
याशिवाय आतापर्यंत सीआयडीने या प्रकरणात जप्तीही सुरू केली आहे. सीआयडीकडून या प्रकरणात खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकऱणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. यात वाल्मिक कराडची 100 हून अधिक बँक खाती सील करण्यात आली आहे. म्हणजेच आता या खात्यांमधून वाल्मिक कराडला पैशांचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यासोबत त्यांची आणखी कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत. त्याचाही शोध सुरू आहे. तसेच या जप्तीसंदर्भात उच्च न्यायालयाकडे पत्र सादर करण्यात आले आहे.
Diabetes मुळे डोळ्यांच्या नसा होतात कमकुवत, आजच चालू करा ‘हे’ उपाय
रविवारी वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांची सीआयडी पथकाने केज पोलिस ठाण्यात एक तास चौकशी केली. आतापर्यंत त्यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली. तसेच चार ते पाच महिलांना बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते. तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. अद्याप त्यांची नावे समोर आली नसली, तरी खंडणी प्रकरणातील आरोपीच्या जवळचे असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिस आणि सीआयडीकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरताना दिसत आहे.