भाजपाशासित राज्यांत अंतर्गत कलह ! पाच मुख्यमंत्री बदलण्याची होतेय चर्चा
पुणे – महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे वाढणारे गुन्हे यावर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने युवक सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले , “आज आपण इथे उपस्थित राहून हे दर्शवले आहे कि भारत मातेच्या भविष्यासाठी हे आंदोलन किती महत्त्वचे आहे. या 10 वर्षात बेरोजगारी, नशा खोरी, ड्रग्ज रॅकेट याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या व्यसनामुळे केवळ तो व्यसन करणारा युवक बरबाद होतं नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब बरबाद होते. आज या मोदी सरकारने भारताची प्रतिमा खराब केली आहे. हे सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे, असा आरोप ही यावेळी त्यांनी केला. तसेच बेरोजगारी आणि नशेखोरी थांबवण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी ही केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“नोकरी द्या नशा नको” अशा घोषणा देत काँग्रेस भवन येथून पदयात्रा करीत हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले. पुढे बालगंधर्व चौकात आंदोलन कर्त्यांना अडविण्यात आले. तर पोलिसांकडून काही आंदोलन करणार्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शिवराज मोरे म्हणाले , “आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला मिळणारे उद्योग, रोजगार आज गुजरातला पळवण्याचे काम मोदी, शहा करत आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डोळे झाकून बसले आहेत. बेरोजगारीमुळे आज महाराष्ट्र काय संपूर्ण देशातले तरुण देशोधडीला लागले आहेत. वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक तरुणांनी परदेशात पळ काढला आहे. आज महाराष्ट्र उडता पंजाब झाला आहे. एवढेच काय तर आज बीडचा बिहार झाला आहे. आज महाराष्ट्राची प्रतिमा घसरत चाली आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही आजची लढाई निवडणुकी पुरता नाही तर युवकांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यत ही लढाई चालू राहणार आहे. ड्रग्सचे रॅकेट महाराष्ट्रात थांबवल्या शिवाय आम्ही ही लढाई थांबवणार नाही”.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एहसान खान म्हणाले ,” आज या आंदोलनात तरुणांचा जोश दिसत आहे. यावरून आपल्याला कळते कि आज देशात बेरोजगारीचे प्रमाण किती वाढले आहे. आज केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे डोळेझाक करत आहे. अशा या सरकारचे आपल्याला या आंदोलनातून डोळे उघडणी करायची आहे. तर सौरभ अमराळे म्हणाले, “आधी पुण्याची ओळख ही विद्येचे माहेर घर म्हणून होती मात्र आता ड्रॅगचे माहेर घर म्हणून ओळखली जात आहे. आज पुण्यात सर्वात जास्त व्यसनाच्या आधीन गेलेले तरुण पाहायला मिळत आहे”.