बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
बांगलादेशी तस्करांना हद्दपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या मोर्चामध्ये हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप विश्व हिंदू परिषद विजय गाढवे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे शिवाजी तुपे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संघटक सुनील घनवट जिल्हा समन्वयक हेमंत सोनवणे इत्यादी सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना घनवट म्हणाले भारतातून सर्व बांगलादेशी नागरिकांना बाहेर घालवले पाहिजे वर्ष 2025 मध्ये 16 मे हा अखेरचा दिवस ठरला पाहिजे युवकांना जर आरक्षणामुळे 25000 रोजगार मिळत असतील तर बांगलादेशी हटवल्यावर किमान 80 लाख रोजगार उपलब्ध होतील प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून या घुसखोराविरोधात मोहिम उभारली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली.
स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले
पुण्यासारख्या महानगरात बांगलादेशातून आलेल्यांची संख्या मोठी असून, वेगवेगळ्या भागात वास्तव करणाऱ्यांना पुणे पोलिसांकडून पकडले जात असताना स्वारगेट परिसरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडले आहे. महर्षीनगर भागात ही कारवाई केली असून, मध्यभागातूनच बांगलादेशीला पकडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी एहसान हाफिज शेख (वय ३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश, तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
भारतात राहण्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना भारतात घुसखोरी करून डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शिताफीने अटक केली आहे. शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याच्या बाजुला कोळेगाव आहे. कोळेगावातील कृष्णा मंदिराच्या मागे अनिल पाटील चाळीत या तीन महिला राहत होत्या. कोळेगावात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ एक पथक स्थापन केले. या महिला कोळेगावात राहतात का, त्या कोणत्या व्यवसाय करतात याची पहिले गुप्त माहिती काढली. या माहितीची खात्री झाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक कोळेगावात दाखल झाले. त्यांनी महिलांना ताब्यात घेतले.