पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या सुमारास गावाकडे चालेल्या तरुणीला फसवून बंद असलेल्या गाडीमध्ये अत्याचार केला. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर नराधम दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या हाती लागला आहे. मात्र या प्रकरणावरुन जोरदार रोष व्यक्त करण्यात आला आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी देखील चौकी फोडत आंदोलन केले. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. यानंतर आता कॉंग्रेस पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
स्वारगेट बस स्थानकात अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून अटक करण्यात आली.या आरोपीला लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून काही वेळात आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.यादरम्यान लष्कर पोलीस स्टेशनबाहेर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी केले. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्री,पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तारिक बागवान,विरधवल गाडे.मेघश्याम धर्मावत, आनंद दुबे,आजिनाथ केदार,गणेश उबाळे,पुणे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, हडपसर वि.आ.मतिन शेख, कोथरूड वि.आ.आजीत ढोकळे, सद्दाम शेख, स्वप्निल गायकवाड,विशाल कामेकर, हर्षद हांडे, स्वप्नील शेलार,सौरभ रूपनर, वैभव बुरंगुले, मुरली बुधराम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “नुकताच गृहमंत्र्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनंदन पत्र देण्यात आले. हे पत्र कशाच्या आधारावर गृहमंत्र्यना देण्यात आले. आज पुणे गुन्हेगारीच्या दिशीने वळत आहे त्याला जबाबदार कोण. आज हे सरकार महिल्यांच्या सुरक्षा बाबत अपयश ठरलेले आहे. जर या आरोपीला फाशीची शिक्षा नाही झाली तर युवक काँग्रेस कडून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल”.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सौरभ आमराळे म्हणाले, आज पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सरकार केवळ आश्वासन देण्यात व्यस्त आहे. एवढेच काय तर गृहमंत्र्यांनी चक्क पीडितेवर आरोप केले आहे. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि दुसरी कडे आज त्याच बहिणीवर अत्याचार होतं आहे तर सरकार मूक गिळून बसले आहे. स्वारगेटची घटना फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”.