फोटो सौजन्य- pinterest
जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यंदा जन्माष्टमी शुक्रवार, 15 ऑगस्ट तर गोपाळकाला शनिवार, 16 ऑगस्ट रोजी आहे. हा सण धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. यावेळी गोपाळकालाच्या दिवशी वृद्धी, सर्वार्थ सिद्धीसह, अमृत सिद्धी योग तयार होत आहे. ज्या चंद्राला मनाचा कारक मानले जाते तो आता आपल्या राशीमध्ये 11.43 वाजता वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आता सध्या शुक्र आणि गुरु ग्रह दोघेही मिथुन राशीमध्ये स्थित आहे. त्यामुळे गजलक्ष्मी योग तयार होणार आहे. गोपाळकालाच्या दिवशी ग्रहांचे होणारे हे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरणार आहे जाणून घ्या
गोपाळकालाच्या दिवशीच्या दुर्मिळ योगामुळे मेष राशीच्या लोकांना अपेक्षित लाभ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आदर मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना करिअरमध्ये चांगले यश मिळेल. यावेळी तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. या काळात जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. श्रीकृष्णाचा आशीर्वादाने तुमचे नाते अधिक दृढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला राहील. या काळामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. जे लोक कला क्षेत्रांशी संबंधित आहे अशा लोकांना अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. त्यासोबत व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. मान-सन्मान आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कुटुंबासह धार्मिक स्थळी तुम्ही जाऊ शकता. हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास भरलेला राहील. तसेच तुमच्यावरील मानसिक ताण देखील कमी होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत चांगले पद मिळेल. व्यवसायामध्ये नफा होईल आणि पगारात देखील वाढ होऊ शकते. परदेशात जाण्याच्या योजना प्रत्यक्षात येताना दिसतील.
नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आदर आणि प्रगतीच्या संधी मिळतील. यावेळी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्ही कुटुंबासह बाहेर फिरायला जाऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)