फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, भौतिक सुख आणि सर्जनशीलतेचा प्रतीक मानले जाते. यावेळी तो कर्क राशीमध्ये राहून शनिवार, 23 ऑगस्ट रोजी रात्री 8.42 वाजता पुष्प नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रामध्ये गुरु ग्रहाची कृपा आणि शनीची स्थिरता असते. त्यामुळे हे संक्रमण खूप शुभ मानले जाते. म्हणून हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे काही राशीच्या जीवनामध्ये प्रेम, आर्थिक स्थिरता आणि सर्जनशीलता वाढेल. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र असल्याने त्याचा परिणाम काही लोकांच्या भावनांवर देखील होऊ शकतो. शुक्र ग्रहाचे पुष्प नक्षत्राचे कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण त्यांच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या घरामध्ये होणार आहे. घर धैर्य, संवाद आणि भावंडांशी यांचा संबंध येतो. या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांमधील सर्जनशीलता आणि कौशल्यामध्ये वाढ होईल. लेखन, कला किंवा संवादाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला भावंडांकडून मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जे लोक व्यवसायात भागीदारीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ राहील. या लोकांना सर्जनशीलता आणि सामाजिक संबंधामध्ये फायदा होईल.
मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहांचे संक्रमण दुसऱ्या घरात होत आहे. याचा संबंध घर धन, वाणी आणि कुटुंबाशी आहे. या लोकांना पुष्प नक्षत्राच्या संक्रमणाचा फायदा होईल. ज्यामुळे व्यवसाय, लेखन किंवा कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना त्याचा विशेष फायदा होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. नवीन कपडे, दागिने किंवा सौंदर्य उत्पादने खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जातील. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुसंवाद मिळेल.
कर्क राशीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहांचे संक्रमण पहिल्या घरामध्ये होणार आहे. हे संक्रमण तुमचे व्यक्तिमत्त्व आणि आरोग्य दर्शवितो. कर्क राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रभावी होईल. पुष्य नक्षत्रामुळे प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कला, साहित्य किंवा सर्जनशील क्षेत्रांशी संबंधित लोकांना विशेष यश मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहांचे संक्रमण अकराव्या घरामध्ये होत आहे. लाभ, मित्र आणि इच्छा पूर्ण करणाऱ्याशी यांचा संबंध आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ असणार आहे. पुष्य नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच सोशल नेटवर्किंगमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जे व्यावसायिक भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. तसेच या लोकांना आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळतील.
मीन राशीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहांचे संक्रमण पाचव्या घरामध्ये होत आहे. घर प्रेम, मुले आणि सर्जनशीलतेशी याचा संबंध आहे. त्यामुळे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पुष्य नक्षत्रामुळे प्रेमसंबंध आणि सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. प्रेम, सर्जनशीलता आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)