फोटो सौजन्य- pinterest
२२ ऑक्टोबर रोजी कार्तिक महिन्यातील शुभ दिवस आज आहे.ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र दिवसरात्र तूळ राशीमधून संक्रमण करणार आहे. चंद्र सूर्य, मंगळ आणि बुध यांच्याशी होणाऱ्या युतीमुळे चंद्रग्रही योग तयार होईल. तसेच मंगळ आणि चंद्र यामुळे चंद्र मंगळ योग आणि बुधादित्य योग तयार होईल. स्वाती नक्षत्रामुळे मेष, कर्क, कन्या, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगाचा फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात नशिबाची चांगली साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश राहतील. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यशाली राहणार आहे. तुम्हाला वडिलांकडून फायदा होईल. जर तुम्ही पूर्वी गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला आज चांगला परतावा मिळेल. तुम्ही अकाउंटिंग आणि तांत्रिक कामात चांगली कामगिरी कराल. तसेच तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या देखील येतील. तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून पैसे कमविण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कामावर चांगली कामगिरी कराल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळेल. तुमची प्रलंबित कामे यावेळी पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना आज अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे लोक मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित आहे अशा लोकांना आजचा दिवस खूप फायदेशीर आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित असलेले काम आज पूर्ण होईल.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. राजकारणाशी संबंधित असलेले संपर्क फायदेशीर ठरतील. तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या समस्या दूर होतील. जे लोक नोकरी बदल करण्याचा विचार करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)