फोटो सौजन्य- pinterest
2026 वर्ष ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टिकोनातून विशेष असणार आहे. या वर्षी अनेक प्रमुख ग्रह संक्रमण आणि त्यांच्या हालचालींमध्ये बदल होताना दिसून येणार आहे. या बदलांचा आणि हालचालींचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि वर्षभर मीन राशीतून संक्रमण करणार आहे. राहू कुंभ राशीत राहील आणि 2026 च्या शेवटी मकर राशीत प्रवेश करेल. शुक्र, सूर्य आणि मंगळ हे वेळोवेळी राशी बदलणार आहे. यावेळी गुरू मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून संक्रमण करणार आहे. हे संक्रमण 2026 मध्ये काही राशीच्या लोकांना आव्हानात्मक राहणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांवर 2026 मध्ये शनिच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. या काळात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत तुम्हाला नुकसान होऊ शकते. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर शहाणपणाने निर्णय घ्या. घाई महागात पडू शकते. नवीन वर्षात तुमचे खर्चही वाढू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहावे. जे लोक व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.
सिंह राशीच्या लोकांना या काळामध्ये कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. शनिचा प्रभाव तुमच्यावर परिणाम करत आहे, ज्यामुळे तुमचे जीवन संकटांनी भरलेले आहे. आरोग्याच्या समस्या कायम राहतील आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीचा काळजीपूर्वक विचार करावा, अन्यथा भविष्यात तुम्हाला नुकसान होऊ शकते. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना अनेक समस्या आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या लोकांनी सावध राहावे.
धनु राशीच्या लोकांवर शनिच्या धैय्याचा प्रभाव असलेला जाणवेल. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहणार नाही. धनु राशीच्या लोकांना खर्चात वाढ होऊ शकते, ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. धनु राशीच्या लोकांनी या वर्षामध्ये वादविवाद करण्याचे टाळावे. तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. या लोकांना व्यवसायात देखील नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनी सहकार्याशी वाद घालणे टाळावे आणि सावधानता बाळगावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 2026 मध्ये शनि, राहू, केतू आणि बुध या ग्रहांच्या हालचालीमुळे आव्हानात्मक ठरणार आहे
Ans: ग्रहांच्या हालचालीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे
Ans: 2026 मध्ये मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी सावध राहावे






