फोटो सौजन्य- pinterest
गुप्त नवरात्र दोन महिन्यामध्ये साजरी केली जाते. पहिली म्हणजे आषाढ महिना आणि दुसरी माघ महिन्यामध्ये. यंदा आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची सुरुवात उद्या गुरुवार, 26 जून रोजी होत आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार गुप्त नवरात्रीमध्ये जो भक्त देवीची मनोभावे पूजा करतो त्या साधकावर देवीची कायम कृपा राहते. देवीने दुर्गेचे वेगवेगळे 9 अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला होता. त्यामुळे भक्त नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या 9 रुपांची पूजा करतात. या नऊ दिवसांत अखंड ज्योती प्रज्वलित केल्यानंतर देवीचे ध्यान आणि पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच भक्तांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, असे देखील म्हटले जाते.
गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गेच्या शैलपुत्र रुपाची पूजा केली जाते. तिचे रुप हे अतिश्य शांत, द्याळू आणि साधे असे आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल धरून बैलावर स्वार होते. म्हणून तिच्या या रुपाला वृषभरुधा असे देखील म्हटले जाते.
असे मानले जाते की, देवी शैलपुत्रीने कठोर तपश्चर्या करून सर्व प्राण्यांचे रक्षण केले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने दुःखांपासून मुक्तता मिळते. शैलपुत्रीच्या पूजेमुळे आपल्या शरीरातील उर्जेचे केंद्र असलेल्या मूलाधार चक्राची जागृती होते. यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये स्थिरता, सुरक्षितता आणि मानसिक शांती राहते. तसेच जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते.
शैलपुत्री देवीचा आवडता रंग पांढरा आहे. हा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. देवीला पांढरा रंग आवडत असल्यामुळे देवीची पूजा करताना पांढऱ्या रंगाचे साहित्य, फुले आणि मिठाई अर्पण केली जाते. असे मानले जाते की, शैलपुत्री देवीची पूजा केल्याने मुलींना चांगला वर मिळतो. तसेच घरात समृद्धी येते आणि धन आणि धान्याची कमतरता राहत नाही.
पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करुन घेतल्यानंतर तिथे शुभ मुहूर्तावर ज्योत प्रज्वलित करुन कलशाची स्थापना करा.
त्यानंतर चौरंगावर लाल वस्त्र पसरवून शैलपुत्री देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवा.
पूजेची सुरुवात करताना प्रथम पूजनीय गणपती बाप्पाची आराधना करुन त्यानंतर देवी शैलपुत्रीची आराधना करावी.
पूजेच्या वेळी तांदूळ, सिंदूर, धूप, सुगंध, फुले, मिठाई, दक्षिणा अर्पण करा. त्यानंतर देवीच्या मंत्रांचा जप करा.
ओम ह्नी क्लीम चामुण्डाय विचारे ओम शैलपुत्री देवाय नमः। या मंत्रांचा जप करुन झाल्यानंतर तुपाचा दिवा लावून देवीची आरती करावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)