फोटो सौजन्य- pinterest
18 ऑक्टोबर 2025 मध्ये गुरु ग्रहाने कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि 5 डिसेंबर रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर 2 जून 2026 पर्यंत गुरु ग्रह मिथुन राशीमध्ये संक्रमण करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये तो 2 जून रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गुरु ग्रह या राशीच्या लोकांवर कृपा करणार आहे. जानेवारी 2026 ते जून 2026 पर्यंत ज्ञान, गुरु, संपत्ती, किर्ती आणि आनंदाचा ग्रह असलेला गुरु ग्रह काही राशीच्या लोकांवर आशीर्वादाचा वर्षाव करतील. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना गुरु ग्रहाच्या या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल आणि अनपेक्षित स्त्रोतांकडूनही पैसे येतील. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
2026 मध्ये होणारे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना समृद्धी मिळेल. या काळात तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल. तुम्हाला सुरक्षित आणि भाग्यवान वाटू शकते. तुमची दीर्घकाळापासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला अपेक्षित बढती मिळू शकते. नवीन संधी तयार होतील.
गुरू कर्क राशीतून पहिल्या घरात संक्रमण करेल, म्हणजेच तो तुमच्या राशीत संक्रमण करेल, जिथे तो त्याच्या उच्च स्थितीत पोहोचेल. तुमच्या राशीत गुरूचे आगमन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये नवव्या आणि सहाव्या घरात होणार आहे. देवांचा गुरु, गुरुचे हे भ्रमण तुम्हाला प्रचंड यश देईल. तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. तुमचे शारीरिक आरोग्य सुधारेल.
कन्या राशीत हे संक्रमण अकराव्या घरामध्ये होणार आहे. हे संक्रमण आनंदाचे दरवाजे उघडेल आणि तुमचे उत्पन्न वाढवेल. गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल आणि तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला या काळात आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्हाला महान आणि आदरणीय लोकांच्या वर्तुळात समाविष्ट केले जाईल. तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल. तुम्हाला तुमच्या अभ्यासात उत्तम यश मिळेल आणि विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला एक यशस्वी आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ओळखले जाईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






