फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो. गुरुवार (गुरु) आणि पुष्य नक्षत्र योग तयार होत आहे. या योगादरम्यान केलेली खरेदी, गुंतवणूक आणि नवीन कामांची सुरुवात दीर्घकाळ लाभदायक ठरते, असे मानले जाते. यावेळी गुरुपुष्यामृत योग गुरुवार, 23 एप्रिल रोजी तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, तेव्हा हा योग जुळून येतो. हा योग नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक आणि खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहणार आहे. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील. जुने कर्जाच्या समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बढतीची संधी मिळू शकते. वरिष्ठांसोबत संबंध चांगले राहतील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम राहील. कोणतेही निर्णय घेणे टाळावे आणि कोणतेही नियोजन विचारपूर्वक करावे.
वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ नशीब बदलणारा राहील. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. सोनं खरेदी आणि संपत्ती वाढीसाठी उत्तम वेळ. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराची साथ मिळेल. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी आणि योग्य तो आहार घ्यावा.
कर्क राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहील. या काळात मानसिक शांती लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थैर्य वाढेल. धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता. या काळात जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. कोणतेही निर्णय घेताना भावनिक न होता सावधगिरीने घेणे गरजेचे आहे.
सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. यावेळी तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. करिअरमध्ये प्रगती आणि प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीत लाभ होईल. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
धनु राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुरु ग्रहाच्या कृपेने आर्थिक निर्णय योग्य ठरतील. मोठ्या संधी मिळू शकतात. अध्यात्म आणि ज्ञानाच्या वृद्धीसाठी हा काळ उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा कामाच्या ठिकाणी ताण कमी होईल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न दूर होतील. आरोग्याच्या समस्या दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गुरुवार (गुरु) आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्यावर तयार होणारा हा अत्यंत शुभ योग आहे. याला “अमृत योग” मानले जाते, ज्यात केलेले कार्य दीर्घकाळ फलदायी ठरते.
Ans: हा योग संपत्ती, समृद्धी आणि यश देणारा मानला जातो. या दिवशी केलेली गुंतवणूक आणि खरेदी विशेष लाभदायक ठरते.
Ans: गुरुपुष्यामृत योगाचा मेष, वृषभ, कर्क, सिंह आणि धनु राशींच्या लोकांना फायदा होणार आहे






