फोटो सौजन्य: pinterest
पुराण काळापासून चालू आलेल्या रुढी परंपरांचा विचार केल्यास महिलांच्या मासिक पाळीला विटाळ समजलं जातं. देव धर्माच्या कार्यात मासिक पाळी असल्यास महिलेला अपवित्र समजण्याची अनिष्ट प्रथा सुरु होती. या पाच दिवसांच्या काळात वेगळं राहणं कोणाला शिवाशिव न करणं इतकं कठीण कुळाचार पाळले जात असायचे. महिलांच्या या मासिकपाळीबाबत स्वामी समर्थांचे काय विचार होते ते जाणून घेऊयात.
पाळी आली की सुरुवातीचे तीन ते चार दिवस वेगळं बसवलं जातं. देवघर, स्वयंपाकघरात त्या स्त्रीला येण्यास मज्जाव घातला जातो. इतकंच नाही तर स्त्रीशक्तीचं रुप असलेल्या देवीची करणं देखील अपशकुन मानला जातो. याबाबत अनेकं संतांनी तसंच समाजसुधारकांनी देखील याबाबत मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केलं होतं.
कलर्स मराठी वाहिनीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेतही स्वामींचे मासिकपाळी बाबतचे विचार स्पष्ट केले आहेत. या मालिकेतील एका प्रसंगानुसार एका महिलेला पाळी आली असल्याने तिला बाजूला बसवलेलं असतं. स्वामी त्या महिलेला जेवण देतात. यावेळी अनेकांनी स्वामींच्या या वागण्याला विरोेध केला होता. त्यावेळी स्वामींनी त्या चार दिवसांचं महत्त्व सांगितलं होतं. पाळीच्या दिवसात महिलांना शारीरिक थकवा येतो म्हणून शेतीच्या आणि इतर कामातून त्यांना आराम मिळावा म्हणून चार ते पाच त्यांच्या हक्काच्या विश्रांतीसाठी असतात. मात्र याचा अर्थ मासिकपाळी विटाळ आहे असा होत नाही असं देखील या मालिकेतून स्वामींचे विचार दाखविण्यात आले होते.
महिन्यातून 3 ते 4 दिवस महिलांना मासिक पाळी येते म्हणजे ती त्या महिलेल्या स्त्रित्वाची खूण आहे. मासिकपाळी म्हणजे विटाळ नव्हे तर एका जीवाला जन्म देण्याचं वरदान निसर्गाने महिलांना दिलेलं आहे. त्यामुळे ज्या पाळीमुळे जीव जन्माला येतो ती अपवित्र आणि विटाळ कशी असू शकेल? असं म्हणत स्वामींनी मासिकपाळी बाबतच्या अंधश्रद्धेला कधीही दुजोरा दिला नाही.
शास्त्रीय कारण पाहता, या तीन ते चार दिवसात रक्तस्त्राव जास्त झाल्याने अशक्तपणा जास्त येतो. पुर्वीच्या काळी घरची कामं करुनही महिला शेतातील कष्टाची कामं देखील करत असायच्या त्यामुळे त्यांना रोजच्या कष्टाच्या कामापासून आराम मिळावा यासाठी ते पाच दिवस वेगळं बसवणं गरजेचं होतं. जेणेकरुन त्या स्त्रीला विश्रांती घेता येईल. मात्र काही चुकीच्या समजुती या मोठ्या प्रमाणात पसरत गेल्या त्यामुळे मासिकपाळी विटाळ म्हटलं जातं होतं.