जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य आहेत त्यातीलच एक म्हणजे कळसावर पक्षी कधीही बसत नाही. मात्र आता ते पक्षांचा थवा असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत पुराण ग्रंथात काही घटना नमूद केल्या आहेत. याआधारे असं सांगितलं जातं की, भविष्य़ात कधीही जगन्नाथ पुरी मंदिराच्या कळसावर पक्षांचा थवा दिसला तर हा कलियुगाचा अंत जवळ आला असल्याचा संकेत आहे. हे अशुभ संकेत असल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे सध्या मंदिराच्या या घटनेबाबत भिती व्यक्त करण्यात येतेय.
जगन्नाथ पुरीच्या मंदिराबाबत अनेक रहस्य हे प्रश्न निर्माण करतात. आजवर मंदिराबाबतचे गुढ ना विज्ञानाला कळलं ना अध्यात्नाला. मात्र पुराण ग्रंथांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जर हे भाकित खरं ठरलं तर जग एका विनाशाला सामोरं जाण्याची शक्यता आहे. आठव्या शतकात ‘आदि शंकाराचार्यां’नी पुरी येथे जगन्नाथ मंदिराची स्थापना केली. ‘जगन्नाथ’ हा ‘विष्णू’चा अवतार मानला जातो. या मंदिरात अनेक रहस्य आहेत. असं म्हटलं जातं की, या मंदिरात जगन्नाथाचं हृदय आहे, असा भाविकांचा विश्वास आहे त्यामुळे या मंदिराचं सोहळं खूप काटेकोरपणे पाळलं जातं.






