फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 25 जानेवारी रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात केतू ग्रह आपला प्रवास संपवणार आहे. तो या स्थानातून निघून या नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात आपले स्थान घेईल. केतुचे हे संक्रमण 26 मार्च 2026 पर्यंत प्रभावी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि केतूच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांची आध्यात्मिक प्रगती शक्य आहे. दरम्यान, काहींसाठी हा काळ अडचणींचा असू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हाने, व्यवसायात मंदी, नातेसंबंधांमध्ये कलह आणि प्रवासात विविध अडचणी येऊ शकतात. केतूच्या नक्षत्र संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी राहावे सावध ते जाणून घ्या
केतुच्या नक्षत्रातील बदल या राशीच्या लोकांसाठी आव्हानांनी भरलेले राहील. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही समस्या तुमचा ताण वाढवतील. नवीन संधी मिळण्यास वेळ लागू शकतो. वैवाहिक जीवनात भावनिक समज असणे आवश्यक असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
तूळ राशीच्या लोकांना या काळाच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमविवाहातील अडथळे तणाव निर्माण करतील. गुंतवणुकीमुळे तुम्हाला फायदा होईल. जास्त खर्च केल्याने तुमच्या वर्तनावर परिणाम होईल. तुम्हाला विशेषतः तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नातेसंबंधामध्ये अडचणी येऊ शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. हा काऴ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तु्म्ही सहभागी होऊ शकता. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
मकर राशीच्या लोकांना हा काळ आव्हानात्मक राहणार आहे. नवीन नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. हंगामी आजारांपासून सावध रहा. आर्थिक व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगा, अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. चैनीच्या वस्तूंवरही खर्च होऊ शकतो. तुमच्या खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: या काळात काही ग्रहांची स्थिती प्रतिकूल होत असल्याने मानसिक ताण, विलंब आणि अडथळे निर्माण होऊ शकतात.
Ans: कामात अडथळे, वरिष्ठांशी मतभेद, अपेक्षित निकाल न मिळणे किंवा प्रोजेक्टमध्ये विलंब होण्याची शक्यता असते
Ans: केतू नक्षत्राच्या संक्रमणामुळे मिथुन, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी सावध राहावे






