फोटो सौजन्य- pinterest
आज 16 ऑगस्ट शनिवारचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी खूप खास राहणार आहे. चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत आपले संक्रमण करणार आहे. तसेच चंद्र आज त्याच्या उच्च राशीत वृषभ राशीत असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि राहील. चंद्राने त्याच्या वृषभ राशीमध्ये प्रवेश केल्याने गौरी योग तयार होईल. त्यासोबतच कृतिका नक्षत्रासोबतच ध्रुव योग आणि सुनाफ योग देखील तयार होईल. बुधादित्य आणि गजलक्ष्मी योग देखील तयार होईल. आज शनिवार असल्याने आजचा शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित राहील. गौरी योग आणि श्रीकृष्णाच्या कृपेने आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर या राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभेल. शनिवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांना फायदेशीर आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस शुभ राहणार आहे. यावेळी तुमची समाजामध्ये कीर्ती वाढलेली राहील. तसेच तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. परदेशात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. यावेळी तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकेल. जर तुम्ही करिअर किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुम्हाला व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळतील. सरकारी सेवेशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमचे कोणतेही काम अडकले असल्यास ते लवकरात लवकर पूर्ण होईल. तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवारचा दिवस चांगला असेल. आज तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायासाठी लांब पल्ल्याच्या सहलीला जाण्याची संधी देखील मिळू शकते. प्रवास करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. वडिलांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या कामांबद्दल अधिक गंभीर असाल. ती पूर्ण करण्यासाठी किंवा नवीन योजना आखण्यासाठी तुम्ही अतिरिक्त प्रयत्न कराल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
शनिवारचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तुम्हाला व्यवसायातून कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात कुटुंबाकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. तुम्ही आज मित्रांसोबत वेळ घालवू शकता. वैवाहिक जीवन आनंददायी असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)