फोटो सौजन्य- pinterest
देवी लक्ष्मीला समर्पित महालक्ष्मी व्रत हे 16 दिवसांचे असते. या काळात महिला विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा करुन उपवास करतात. त्यासोबतच महालक्ष्मी देवीची कथा वाचतात किंवा ऐकतात. तसेच या दिवशी दान करण्याला देखील महत्त्व आहे. 16 व्या दिवशी कलश विसर्जित करून उपवास सोडला जातो. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमीला महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला संपते.
महालक्ष्मी व्रत हे धन आणि समृद्धीसाठी पाळले जाते आणि त्यात आंबट किंवा खारट पदार्थ खाल्ले जात नाही. जर कोणी 16 दिवस उपवास करु शकत नसेल तर ती व्यक्ती 3 दिवस उपवास करु शकते. ज्यामध्ये तो पहिल्या, मधल्या आणि शेवटच्या दिवशी पूजा करून पुण्य मिळवू शकतो. या काळामध्ये काही उपाय केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.
महालक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. नंतर ती खीर कुमारिका मुलींमध्ये वाटा. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते. याशिवाय रात्री चंद्राला दुधासह अर्घ्य अर्पण करावे आणि या वेळी ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले वसले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः’या मंत्राचा जप करावा.
महालक्ष्मी व्रताच्या वेळी देवीची विधिपूर्वक पूजा करावी. पूजेमध्ये नाण्यांचा समावेश करावा. पूजा झाल्यानंतर ती नाणी लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावी. असे केल्याने साधकाला धनप्राप्तीची संधी मिळते, अशी मान्यता आहे.
महालक्ष्मीच्या पूजेच्यावेळी देवीच्या पायाजवळ कमळ आणि पलाश फुलांसह श्रीयंत्र अर्पण करावे. त्यासोबतच देवी लक्ष्मीला फळे, फुले, अगरबत्ती, लाल कपडे आणि श्रृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. पूजा करताना देवी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा व्यक्तीवर राहून आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.
महालक्ष्मी व्रताचे पुण्य मिळविण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. महालक्ष्मी व्रताच्या वेळी घर, मुख्य दरवाजा आणि देव्हारा यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. या उपवासाच्या वेळी आंबट आणि खारट पदार्थ खाऊ नका. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवून उपवास केल्यास तुम्हाला त्याचे पूर्ण पुण्य मिळेल, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)