फोटो सौजन्य- istock
आज गुरुवार, 10 जुलैचा दिवस मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर असलेला दिसून येईल. तसेच गुरुवारचा अधिपती ग्रह गुरु असल्याने गुरुची संख्या 3 मानली जाते. अंकशास्त्राच्या मते, मूलांक 1 असलेल्या लोकांनी कामाच्या ठिकाणी लोकांकडून अपेक्षा करणे टाळावे आणि कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तसेच मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस जबाबदाऱ्यांनी भरलेला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नये. तसेच कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे. कोणताही निर्णय घेताना घरच्यांचा किंवा वरिष्ठा्ंचा सल्ला घ्या. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये काही अंतर असू शकते, परंतु तुम्ही संभाषण आणि परस्पर समंजसपणाने प्रत्येक समस्या सोडवू शकता.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी मनात सर्जनशील विचार येऊ शकतात. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. लेखन, संगीत किंवा डिझाइन यासारख्या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होईल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तसेच या लोकांवर अनेक जबाबदाऱ्या असतील. कामाच्या ठिकाणी कोणाच्याही हातात काम सोपवण्याचे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला ते काम पुन्हा करावे लागू शकते. कामाबद्दल अनुभवी व्यक्तीशी बोला.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज थोडा थकवा जाणवू शकतो. प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जे लोक व्यवसायामध्ये आहेत ते कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात. आज नवीन भागीदारी किंवा करार सुरू होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम काळजीपूर्वक करावे लागेल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही जोडीदारासोबत तुमचा वेळ घालवू शकतात. फॅशन, कार्यक्रम, डिझाइन किंवा चित्रपटांशी संबंधित लोकांना आज फायदा होऊ शकतो. एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करु शकता.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे मन काही गोष्टींमध्ये अडकलेले राहू शकते. हे लोक धार्मिक गोष्टीत सहभागी होतील. कामाच्या ठिकाणी, तुम्हाला इतरांच्या बोलण्याने प्रभावित होण्याचे टाळावे लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
मूलांक 8 असलेल्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी पुढे जाल आणि निश्चितच यश मिळवाल. खूप दिवसांपासून ज्या समस्येत अडकले असाल त्यातून सुटका होईल. सहकाऱ्यांशी सुसंवाद राखणे फायदेशीर ठरेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कोणतेही निर्णय घाईघाईमध्ये घेऊ नका नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते. तुमचा राग नियंत्रित करा आणि घाईघाईत कोणतेही नाते खराब करू नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)