फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे संक्रमण वेळोवेळी होत राहते. ज्यामुळे ग्रहांसोबत अनेक प्रकारचे राजयोग तयार होतात. या योगाचा परिणाम काही लोकांच्या जीवनावरच होत आहे. यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये दोन ग्रहांचे युतीमुळे एक राजयोग तयार होत आहे. त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होत आहे. या काळात होणाऱ्या युतींमुळे तुमची प्रत्येक क्षेत्रातील कामे पूर्ण होऊ शकतात.
सप्टेंबर महिन्यामध्ये शुक्र ग्रहाला आनंद आणि विलासाचे प्रतीक मानला जातो. तूळ राशीमध्ये स्वतःच्या राशीत प्रवेश करत आहे. ज्यामुळे मालव्य राज योगाची निर्मिती होईल. या महिन्यात बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होईल. ज्या लोकांचा आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. कोणत्या राशी भाग्यवान असतील, जाणून घ्या
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. यावेळी बुधादित्य आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. जे लोक भागीदारीमध्ये काम करत आहे अशा लोकांना चांगले यश मिळू शकते. अविवाहितांना या काळात लग्नांचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील आणि उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो.
मकर राशीच्या लोकांना सप्टेंबरचा महिन्यामध्ये मालव्य आणि बुधादित्य राजयोग खूप फायदा होणार आहे. या राजयोगाचा फायदा करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. उत्पन्नामध्ये वाढ होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी वाढतील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी वाढतील. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होईल. तुम्ही सामाजिक कार्यात आवड निर्माण होईल. तसेच तुम्ही या काळात धार्मिक कार्यात देखील सहभागी होऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी या काळात मालव्य आणि बुधादित्य राजयोग जीवनात खूप सकारात्मक परिणाम मिळतील. यावेळी शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये नवव्या घरात असल्यास तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. समाजात तुम्हाला आदर मिळेल. ज्या लोकांना परदेशाच जाण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. यावेळी तुम्ही मोठी गुंतवणूक करणे फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)