फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.29 वाजता आपले संक्रमण बदलत आहे. पंचांगानुसार, धैर्य, ऊर्जा, शौर्य, शक्ती, जमीन, वाहने इत्यादींसाठी जबाबदार असलेला मंगळ ग्रह गुरु ग्रहाच्या मालकीच्या विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आता तो स्वाती नक्षत्रात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्ञान, विस्तार आणि भाग्य यावर गुरु ग्रहाचे राज्य आहे. गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेले विशाखा नक्षत्र दृढनिश्चय, महत्त्वाकांक्षा, नेतृत्व आणि यशाशी संबंधित आहे. या नक्षत्रामध्ये मंगळाचे होणारे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. परंतु या राशीच्या लोकांना संक्रमणाचा खूप फायदा होणार आहे. गुरु ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या संक्रमणाचा मेष राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. ज्यावेळी मंगळ गुरुच्या विशाखा नक्षत्रात प्रवेश करतो हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी धैर्य, आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता अनेक पटींनी वाढवेल. या काळात करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकते तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जमीन आणि वाहनांशी संबंधित कामातही यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर राहील. विशाखा नक्षत्रातील मंगळाचे संक्रमण कामाच्या ठिकाणी प्रगती, प्रतिष्ठा आणि सन्मान आणेल. जे लोक सरकारी नोकरी आणि प्रशासकीय सेवेत आहे अशा लोकांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ खूप चांगला राहील. गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जुन्या कर्जातून तुमची सुटका होऊ शकते. तसेच तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.
धनु राशीवर स्वतः गुरु ग्रहाचे अधिपत्य आहे. या नक्षत्रात मंगळाचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे नशिब चमकणार आहे. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ शुभ राहील. या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळात तुमच्या जीवनात स्थिरता येईल. या काळात तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)