फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची गती आणि त्यांची स्थिती जीवनात विविध बदल घडवून आणणारी राहील. ग्रहांचा उदय आणि अस्त होणे व्यक्तीच्या जीवनात ऊर्जा, सकारात्मकता आणि यश प्राप्त करू शकते. अशा वेळी 2 मे रोजीचा दिवस विशेष खास आहे कारण या दिवशी मंगळ ग्रह दीर्घकाळ अस्त राहिल्यानंतर पुन्हा उदय पावणार आहेत. मंगळाला साहस, शक्ती, पराक्रम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुमच्या जीवनातील थांबलेले काम पुढे जाते आणि नवीन ऊर्जा संचारते. हा बदल काही राशींच्या लोकांसाठी सकारात्मक बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा राहील. मंगळ उदयचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
ज्यावेळी काही ग्रह सूर्याच्या अधिक जवळ येतात. त्यावेळी त्याची ऊर्जा आणि प्रभाव अधिक कमकुवत होतो या स्थितीला ज्योतिषशास्त्रात ग्रहाचे अस्त होणे किंवा उदय म्हटले जाते. या अवस्थेत ग्रह आपला पूर्ण फायदा देत नाही त्यामुळे त्याचे शुभ परिणाम कमी होतात. ज्यावेळी हा ग्रह सूर्यापासून लांब असतो आणि पूर्णतः दिसतो त्यावेळी त्याला ग्रहाचा उदय म्हटले जाते. उदय अवस्थेत ग्रह पूर्ण शक्तीने सक्रिय असतो. ज्योतिषशास्त्रानुसार 2 मे रोजी सकाळी 4.30 मिनिटांनी मंगळ ग्रहाचे अस्तातून उदय होईल. मंगळ अस्त असताना जीवनात अडथळे, आळस आणि अस्थिरतेचा अनुभव येतो. मात्र जसा मंगळ उदय पावतो तसा व्यक्तीच्या जीवनात ऊर्जा, आळस आणि आत्मविश्वास वाढतो.
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचा उदय सकारात्मक राहणार आहे. मंगळ या राशीचे स्वामी ग्रह देखील आहे. अशा वेळी दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास वेग येईल. जे काम रखडलेले आहे ते या काळात पूर्ण होईल. आरोग्यात सुधारणा होईल. ऊर्जा आणि आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील आणि मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.
तुळ राशीच्या लोकांसाठी हा कालावधी आर्थिकदृष्ट्या समतोल आणि स्थिरता घेऊन येणारा राहील. दीर्घकाळापासून चालत आलेली आर्थिक समस्या दूर होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. कौटुंबिक जीवनात जो तणाव असेल तो कमी होईल. ज्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदाचे आणि शांतीचे राहील. जीवनात सकारात्मकता परत येऊ शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ उदय खूप फायदेशीर राहणार आहे. यावेळी जुने वादविवाद आणि मतभेद हळूहळू दूर होऊ शकतात. मनाला शांतता मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. आत्मविश्वास वाढलेला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मंगळ उदय म्हणजे मंगळ ग्रहाचा पुन्हा प्रभावी होणे. जेव्हा मंगळ सूर्याच्या निकटतेतून बाहेर येतो, तेव्हा त्याचा शुभ प्रभाव वाढू लागतो.
Ans: बहुतेक वेळा मंगळ उदय सकारात्मक परिणाम देतो, पण इतर ग्रहस्थितीनुसार त्याचा प्रभाव कमी-जास्त होऊ शकतो.
Ans: मंगळ ग्रह उदयाचा फायदा मेष, तूळ आणि वृश्चिक राशींच्या लोकांना फायदा होणार






